14 महिन्यांनंतर रोहित शर्माचे टी-20 मध्ये पुनरागमन? अशी होणार भारत-अफगाणिस्तान सीरीज

14 महिन्यांनंतर रोहित शर्माचे टी-20 मध्ये पुनरागमन? अशी होणार भारत-अफगाणिस्तान सीरीज

IND vs AFG : 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापासून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटपासून दूर राहिला आहे. आता लवकरच रोहित शर्मा टी-20 मध्ये पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) घरच्या मैदानावर होत असलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करू शकतो. हे त्याचे कर्णधार म्हणून पुनरागमन असेल आणि असे झाल्यास रोहित 14 महिन्यांनंतर टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

रोहित शेवटचा टी-20 सामना 2022 मध्ये खेळला
रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या होम ग्राऊंडवर टी-20 मालिकेत कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. भारतीय संघ 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर संघाची घोषणा केली जाणार आहे. रोहितने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी खेळला होता. त्यानंतर रोहित टी-20 सामना खेळला नाही.

हार्दिक आणि सूर्यकुमार यादव जखमी आहेत
रोहित शर्माच्या पुनरागमनाच्या अटकळांनाही वेग आला आहे कारण आतापर्यंत हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी त्याच्या अनुपस्थितीत टी-20 चे नेतृत्व केले होते, परंतु आता हे दोन्ही खेळाडू जखमी झाले आहेत. अशा स्थितीत रोहितच्या पुनरागमनाची शक्यता दाट आहे. हार्दिक पांड्याला वर्ल्ड कपदरम्यान दुखापत झाली होती तर सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत जखमी झाला होता.

Ram Mandir : श्रीरामांचीच नाही तर अरुण योगीराज यांनी बनवल्यात रेखीव मूर्ती; पाहा फोटो

रोहितप्रमाणेच विराटही 14 महिन्यांपासून टी-20 पासून दूर
रोहित शर्मासोबत विराट कोहलीही गेल्या 14 महिन्यांपासून टी-20 क्रिकेट खेळलेला नाही. विराट आणि रोहित यांनी अखेरचा सामना इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये टी-20 विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा खेळला होता. त्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव करत स्पर्धेतून बाहेर काढले होते. तेव्हापासून हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय फॉर्मेटवर लक्ष केंद्रित करत होते, पण आता या वर्षी जूनमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे, तेव्हा विराट आणि रोहित टी-20 मध्ये पुनरागमन करू शकतात.

‘पंचक’ रिलीज होण्यापूर्वी माधुरी दीक्षित पतीसोबत सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा फोटो

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
* 11 जानेवारी- मोहालीत पहिला टी-20 खेळवला जाईल.
* दुसरा टी-20 इंदूरमध्ये 14 जानेवारीला खेळवला जाईल.
* तिसरा आणि शेवटचा टी20 सामना 17 जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
सर्व सामने सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज