Ram Mandir : श्रीरामांचीच नाही तर अरुण योगीराज यांनी बनवल्यात रेखीव मूर्ती; पाहा फोटो

1 / 7

अयोध्येतील श्रीराम मंदिरात कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज (Arun Yogiraj ) यांनी तयार केलेल्या श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल असे सांगण्यात येत आहे.

2 / 7

अरुण योगीराज कर्नाटकातील मैसुरू येथील रहिवासी आहेत. योगीराज यांच्या कुटुंबात मागील पाच पिढ्यांपासून मू्र्ती तयार करण्याचं काम केलं जात आहे.

3 / 7

देशातील अनेक राज्यांतून योगीराज यांनी तयार केलेल्या मूर्तींना मोठी मागणी असते. पीएम मोदी यांनीही योगीराज यांच्या कलेचं कौतुक केलं आहे.

4 / 7

अरुण योगीराज यांचे वडिलही उत्तम दर्जाचे शिल्पकार आहेत. अरुण योगीराज लहानपणापासूनच या कामात आहेत.

5 / 7

एमबीएचे केल्यानंतर त्यांनी खासगी कंपनीत काम केलं. त्यानंतर थोड्याच दिवसांत नोकरी सोडली. 2008 पासून मूर्तिकलेतच करिअरची सुरुवात केली.

6 / 7

इंडिया गेट येथे आज जी 30 फूट उंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती दिसत आहे ती मूर्ती अरुण यांनीच तयार केली आहे.

7 / 7

अरुण योगीराज यांनी केदारनाथ येथे आदि शंकराचार्य यांची 12 फूट उंच मूर्ती तयार केली होती. अशा अनेक मूर्ती तयार करून त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube