Download App

शेवगावची जनता दडपशाहीला थारा देणार नाही, आमदार मोनिका राजळे कडाडल्या…

दहिगावने परिसरात दबावाचे राजकारण होत आहे. विकासकामासाठी ठराव देण्यात अनेकदा आडकाठ्या घालण्यात आल्या. - आमदार राजळे

  • Written By: Last Updated:

शेवगाव : विकास प्रवाहात भेदाभेद न करता सर्वांना सामावून घ्यायचे असते. आपल्या संस्कृती आणि संस्कारामुळे आपण देखील हे पथ्य प्रामाणिकपणे जपले आहे. मात्र दहिगावने परिसरात दबावाचे राजकारण होत आहे. विकासकामासाठी ठराव देण्यात अनेकदा आडकाठ्या घालण्यात आल्या. तरीही आपण दहिगावनेसह परिसरातील गावागावात मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन येथील कामे मार्गी लावली आहेत. आता प्रत्येक गावात तरुण नेतृत्व उदयास येत आहेत. कोणाच्या दबावाला बळी पडू नका. मी आपल्यासोबत आहे, आरोप करणारांना आपली कामे दाखवा. मित्रपक्षासह भाजप (BJP) कार्यकर्ते त्यांचे मनसुबे हाणून पाडतील, अशी ग्वाही आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी दिली आहे.

प्रतिक्षा संपली! पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार लॉन्च 

शहरटाकळी येथे मतदारांसी संवाद साधतांना आ. राजळे बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, ताराचंद लोढे, भिमराज सागडे, अमोल खरड, संदीप खरड, अनिल सुपेकर, सुभाष बरबडे, मोहनराव खंडागळे, रामाआप्पा गिरम, अशोक निंबाळकर, बाळासाहेब विखे, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना आमदार राजळे यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता महायुतीच्या शासनाकडून विरोधकांनी आपल्या कारखान्याला मोठी पदरात पाडून घेतली. मात्र त्याचे उतराई होण्याऐवजी मदत करण्याची भूमिका घेतली नाही, त्यांना त्याचा विसर पडला आहे. कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने काम करावे. आपण केलेल्या विकासकामामुळे आपल्याला निवडणूक सोपी असल्याचे यावेळी आ. राजळे म्हणाल्या.

‘नाद – द हार्ड लव्ह’…धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित 

दरम्यान, शहरटाकळी गावात आमदार राजळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून मतदारांना भरभरुन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी राजळे यांचे फटाक्यांची आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले. गावं भेटी दरम्यान अनेक ठिकाणी लाडक्या बहिणीकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले. यावेळी लाडक्या बहिणींनी राजळे यांना आश्वासित करत खंबीरपणे साथ देण्याचे आश्वासन दिले. गावागावात लाडक्या बहिणींकडून होणाऱ्या स्वागतामुळे दुसरीकडे विरोधकांची चिंता वाढल्याचे चित्र आहे.

follow us