Eknath Shinde On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचा हात ज्या गोष्टीला लागतो, त्याचं सोनं होतं, म्हणून आम्ही त्यांना वारंवार राज्यात बोलावतो. पण त्यामुळे काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाहीये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)नाव घेता लगावला. शिर्डी (Shirdi)येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
Parineeti Chopra : पिवळ्या ड्रेसमध्ये काळा गॉगल घालत पटाखा कुडी परिणीची चुडा सेरेमनी, पाहा फोटो
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Nawazuddin Siddiqui दिसणार आणखी एका बायोपिकमध्ये; आजपासून शूटिंगला सुरुवात
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशातील 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण त्यांना ऐकण्यासाठी आले आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात ज्या प्रकल्पाला लागतो, तो वायूवेगाने पूर्ण होतो, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांच्या विकासकामांच्या भूमीपूजनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत आणि आभारही मानले. आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी सहावेळा महाराष्ट्रात आले. आपण जेव्हा जेव्हा त्यांना निमंत्रण दिलं ते स्वीकारत आले, हा त्यांचा मोठेपणा आहे. पंतप्रधान मोदींनी आत्तापर्यंत दोन लाख कोटींच्या कामांचं उद्धाटन आणि लोकार्पण केलं आहे. आज देखील 14 हजार कोटींपेक्षा अधिक कामांचे लोकार्पण झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.