‘हायप्रोफाईल’ खटले लढणारे मानेशिंदे मराठा आंदोलकांसाठी मैदानात; घेणार मोफत वकिलपत्र

‘हायप्रोफाईल’ खटले लढणारे मानेशिंदे मराठा आंदोलकांसाठी मैदानात; घेणार मोफत वकिलपत्र

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाने डोकं वर काढलं आहे. अशातच मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज (26 ऑक्टोबर) पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तिघा जणांना अटक केली आहे. मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Adv. Satish Maneshinde’s team will fight the case of these Maratha protesters for free)

अशात आता या आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात हायप्रोफाईल खटले लढणारे अ‍ॅड. सतीश मानेशिंदे पुढे आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मानेशिंदे न्यायालयात मराठा आंदोलकांची मोफत बाजू मांडणार आहेत. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार आणि श्रीरंग बारगे यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.

Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड; मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

यावेळी बोलताना वीरेंद्र पवार म्हणाले, ते तरुण गुन्हेगार नाहीत, ते मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने मराठा आरक्षणात खोडा घालण्याचे काम केले आहे. त्याचाच राग या तरुणांच्या मनात आहे. ते जे पेरत आहेत, तेच उगवत आहे. ते द्वेष पेरत आहेत, त्यामुळे द्वेष उगवत आहे. मराठा समाज अजूनही शांतच आहेत. त्यामुळे सदावर्ते यांनीही शांत बसावे. आम्ही मराठा आंदोलकांच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन करत नाही. मात्र, आमचा त्यांना पाठिंबा आहे, आमच्या माहितीनुसार लवकरच ॲड. सतीश मानेशिंदे यांची टीम या मराठा आंदोलकांच्या सुटकेसाठी दाखल होणार आहे. असेही वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

Manoj Jarange : वाहनांच्या तोडफोडीचे समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

सतीश मानेशिंदे हे देशातील आघाडीच्या वकील म्हणून ओळखले जातात. अलिकडेच त्यांनी कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळवून देण्यासाठी आणि तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. यापूर्वी ते 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचा खटला लढवणाऱ्या टीमचा ते एक भाग होते. संजय दत्तवर अत्यंत गंभीर आरोप असताना सतीश मानशिंदे यांनी त्याला जामीन मिळवून दिला होता. तेव्हापासून ते प्रकाशझोतात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube