Download App

Shirdi Loksabha : स्वपक्षातील नाराजी वाढली! शिर्डीतील दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत भर

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. शिर्डी लोकसभे (Shirdi Lok Sabha) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना तर मविआकडून भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchaure) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता दोन्ही गटांमध्ये नाराजी, बंडखोरीमुळे उमेदवारांच्या अडचणीत भर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

सांगली आम्हीच लढणार! विशाल पाटलांनी ठाकरे अन् राऊतांना ठणकावलं; मुहूर्तावर घोषणा होणार? 

नगर जिल्ह्यात यंदा बदलेल्या राजकीय परिस्थितीनंतर होणारी निवडणूक देखील चांगलीच गाजणार आहे. शिर्डी मतदार संघ हा यंदाच्या निवडणुकीपर्यंत आरक्षित असल्याने इच्छुकांची संख्या देखील यंदा अधिक आहे. मात्र इच्छा असूनही संधी मिळत नसल्याने पक्षांमध्ये नाराजीचे देखील वाढू लागली. त्यामुळं निवडणुकीपूर्वीच जाहीर झालेल्या उमेदवारांच्या अडचणीत भर पडत आहे. वाकचौरेंच्या उमेदवारीला स्वपक्षासह आघाडीतून विरोध होत आहे. तर लोखंडे यांच्याबाबत असलेल्या मतदार संघातील नाराजीमुळे त्यांची उमेदवारी ऐनवेळी बदलली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Pushpa 2 : पायात घुंगरू अन् उधळला गुलाल; अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टिझर रिलीज 

आघाडीत बिघाडी…
महाविकास आघाडीकडून शिर्डीची जागा ठाकरे गटाकडे असून याठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी फायनल झाली. मात्र यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली. शिर्डीची जागा काँग्रेसकडून लढण्यासाठी उत्कर्षा रुपवते इच्छुक आहेत. मात्र वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर होताच रुपवते यांनीही आपली नाराजी जाहीर केली.

अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्याचा वारसा घेऊन शिर्डी लोकसभेतील माझ्या लोकांसाठी मी लढा देणारच. तसेच एकच ध्यास शिर्डी लोकसभेचा विकास, असे ब्रीद वाक्य घेत रुपवते या बंडाच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी रुपवते यांनी वंचितच अध्यक्ष असलेले प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेतली होती. यामुळे त्या वंचितकडून लोकसभा लढवणार का अशी चर्चा देखील सुरु होती. मात्र यावर अद्याप रुपवते यांनी आपली भूमिका जाहीर केली नाही आहे. मात्र, ठाकरे गटाने उमेदवार बदलावा अशी मागणी रुपवते यांच्यकडून करण्यात येत आहे.

मतदारांची नाराजी लोखंडेंची अडचण
गेली दोन टर्म सलग खासदारकीला गवसणी घालणारे शिर्डी लोकसभेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र लोकसभा मतदार संघात फारसा वावर नसलेले व जनतेशी जनसंपर्क नसलेले खासदार म्ह्णून त्यांच्यावर टीका होत आहे. जनतेची नाराजी व स्वपक्षातूनच होणार विरोध पाहता लोखंडेच्या अडचणीत भर पडत आहे. उमेदवारी जाहीर झाली असली तरी ऐनवेळी लोखंडे यांच्याबाबत मतदार संघामध्ये असलेलं वातावरण व नाराजीचा सूर पाहता उमेदवार बदलला जाऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यातच शिंदे गटामध्ये भाऊसाहेब कांबळे व बबनराव घोलप यांचा प्रवेश झाल्याने त्यांची नावे देखील चर्चेत आहे.

एकंदरीतच शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी असो वा महायुती या दोन्ही गटाकडून आपापले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या विरोधात असलेली स्वपक्षातीलच नाराजी दूर करण्याचे आव्हान देखील पक्षातील वरिष्ठांसमोर आहे. यावर काय तोडगा काढला जातो, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

follow us