Download App

‘विखेंच्या भेटीबाबत बाळासाहेब थोरातांना माहिती होतं’; उत्कर्षा रुपवतेंचं प्रत्युत्तर

मंत्री राधाकृष्ण विखेंच्या भेटीबाबत बाळासाहेब थोरातांना माहित होतं, तरीही टीका करणं हे आश्चर्यच, असं प्रत्युत्तर उत्कर्षा रुपवतेंनी दिलंयं.

Ahmednagar News : काँग्रेस पक्षातून बाहेर का पडलो, तसेच मंत्री राधाकृष्ण विखेंच्या (Radhakrushna Vikhe) भेटीबाबत बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) माहित होतं, तरीही टीका करणं हे आश्चर्यच, असं प्रत्युत्तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rapwate) यांनी दिलं आहे. दरम्यान, काँग्रेस सोडणं हे चुकीची आणि दु:खद बाब असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर बोलताना उत्कर्षा रुपवते यांनी थोरातांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दक्षिण मुंबईनंतर शिंदेंकडून नाशिकही काबीज, लोकसभेसाठी गोडेसेंचं नाव जवळपास निश्चित; आज घोषणा?

नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी रूपवते यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली. थोरात यांच्या या टिकेवर बोलताना रूपवते म्हणाल्या की, मी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच नेत्यांच्या भेटीगाठी घेऊनच मी पुढे जाणार आहे. याबाबतची कल्पना मी थोरात यांना दिली होती. काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला याबाबत मी थोरात यांना कल्पना दिली होती तरी देखील ते टीका टिप्पणी का करतात हे आश्चर्यजनक आहे असे यावेळी बोलताना रूपवते म्हणाल्या आहेत.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, जी भूमिका मी घेतलेली आहे ती मी स्पष्टपणे मांडली आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असून हीच भूमिका घेतली पुढे जाणार आहे. जनतेला एक वेगळा असा सक्षम उमेदवार मिळाला असून जनतेमधून आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत हे असा विश्वास देखील यावेळी रूपवते यांनी व्यक्त केला.

‘भटकती आत्मा’ नेमकं कोण? पुढच्या सभेत मोदींना विचारणार; अजितदादांची सावध प्रतिक्रिया

घरी बसून पद नाही मिळाली…
गेली 16 वर्ष काँग्रेसमध्ये राहून एकनिष्ठेने मी कामं केली. त्यामुळेच मला विविध पदे देखील मिळाली हे सर्व काही घरी बसल्याने झाले नाही. सर्वांच्या पाठबळाने मी आज वरती इथे पोहोचले. गेली तीन पंचवार्षिक आम्ही थांबलो मात्र आम्हाला संधी देण्यात आली नाही. म्हणून वेगळा निर्णय घ्यावा लागला. पक्षातून बाहेर पडल्याने जेवढे दुःख त्यांना झाले तेवढेच दुःख मलाही झाले आहे मात्र एकनिष्ठ राहिलेल्या माझ्या बाबत आता अशी टीका टिप्पणी होती याबाबत मला खंत वाटते असे देखील यावेळी रूपवते म्हणाल्या आहेत.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने शिर्डी लोकसभा निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढली आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून येथे 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवाराकडून जोरदार प्रचार सुरू असून नागरिकांच्या भेटीगाठी देखील घेणे सुरू आहे. याचा शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते या चांगल्या सक्रिय झाल्या आहे. रूपवते यांना मिळणारा जनतेचा पाठिंबा पाहता आता प्रतिस्पर्धी उमेदवारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

follow us