Download App

शिर्डीत ‘नारी शक्ती सन्मान’ सोहळा; अजय-अतुलच्या गाण्यांवर सुजय विखे पाटलांचा सपत्नीक ठेका

शिर्डीत नारी शक्ती सन्मान सोहळ्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सपत्नीक अजय - अतुलच्या गाण्यांवर ठेका धरत नागरिकांचा उत्साह वाढवला.

Sujay Vikhe Patil : शिर्डीत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने नारी शक्ती सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव पार पडला. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ उपस्थित होत्या. या सांस्कृतिक महोत्सवात माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि पत्नी धनश्री पाटील (Dhanshree Patil) यांनी अजय-अतुलच्या गाण्यांवर ठेका धरत नागरिकांचा वाढवला. या सोहळ्याला शिर्डीतील असंख्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या सांस्कृतिक महोत्सवाला अजय-अतुलच्या धमाल जोडीने आपल्या गायनातून उपस्थितांना थिरकण्यास भाग पाडले. तर सुजय विखे पाटील यांच्यासह पत्नीने झिंगाट गाण्यावर ठेका धरत नागरिकांच्या उत्साहात भर घातल्याचं दिसून आलं. शिर्डीत आल्यानंतर अभिनेत्री शर्वरी वाघ यांनी साईबाबांचे मनोभावे दर्शनही घेतलं.

Video: ही मस्ती घरी दाखवायची; तुमच्या दोन्ही हातांवर खून, सुप्रिया सुळेंचा आमदार टिंगरेंवर थेट आरोप

यावेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना अजय-अतुल यांचे लाईव्ह गाणे ऐकता येणे आणि त्यांना जवळून पाहत त्यांच्या कलेचा सन्मान करता येणे म्हणजे ही पर्वणीच म्हणावी लागेल. मोठ्या शहरांमध्ये हजार दोन हजार रुपये देऊन त्यांचे ‘शो’ज होतात. परंतु शिर्डीत सर्वांना मोफत त्याचा आनंद घेता आला. या सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवल्याबद्दल अजय-अतुल जोडीचे आभार सुजय विखे पाटलांनी मानले आहेत.

गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना गुंगीचं औषध दिलं होत; शिवसेना नेते संजय राऊतांचा खळबळजनक दावा

या सोहळ्यादरम्यान अजय-अतुल यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. यावेळी अजय-अतुलच्या प्रत्येक गाण्यावर नागरिकांकडून वन्स मोअरची घोषणा दिली जात होती. तर खुद्ध सुजय विखेंनीही वन्स मोअर म्हणत नागरिकांसमवेत आनंद लुटला आहे.

दरम्यान, या सोहळ्याला हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि गौरव मोरे यांनी देखील आपल्या कॉमेडीने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्यासमवेत गोपीनाथ बापूंनी देखील तुफान कॉमेडी करत नागरिकांना पोट धरून हसण्यासाठी भाग पाडले. या तुफान कॉमेडीच्या कार्यक्रमाने वातावरण अगदी फुलून गेले होते.

follow us