Download App

काहींना वाटले सुट्टी घेतली तर संपले, पण मी संपणाऱ्यातील नाही; पंकजांचा रोख नेमका कोणावर?

  • Written By: Last Updated:

Shiv Shakti Yatra : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रेची चर्चा सध्या राज्यात होत आहे. नुकतेच ही यात्रा जामखेडमध्ये आली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले स्वागत स्वीकारत आभार मानले. यावेळी त्यांनी आपण काही दिवस सुट्टीवर का गेलो याचे कारण देखील सांगितले.

यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या मी दोन महिने सुट्टी घेतली होती ती सुट्टी नव्हती तर  वैतागून मी सुट्टी घेतली होती. यादरम्यान मी स्वतःची कामे केली, आध्यात्माची वाट धरली त्यामुळे ही शिवशक्ती यात्रा घेऊन मी पुन्हा जनतेसमोर आली आहे. मला लोक म्हणत होते कशाला सुट्टी घेता संपून जाताल पण मी संपणाऱ्यातली नाही. फक्त माझी सात सोडू नका असे भावणिक आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी जामखेडच्या सभेत केले.

आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करू नका अन् अकलेचे तारे तोडू नका; बावनकुळेंचा इशारा

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सद्ध्या शिवशक्ती यात्रे निमित्ताने राज्यभर फिरत असून आज दुपारी त्यांची यात्रा अहमदनगरच्या जामखेड येथे आली होती. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून पंकजा यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार राम शिंदे हे देखिल उपस्थित होते. खर्डा चौकात 12 जेसीबीच्या सहाय्याने पंकजा मुंडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला तर क्रेनच्या सह्ययाने भव्य पुष्पमाला पंकजा मुंडे यांना घालण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Pankaja Munde | फुलांची उधळण, मुंडेंना जेसीबीच्या सहाय्याने घातला हार | LetsUpp Marathi

Tags

follow us