Download App

Devendra Fadnavis : मला जेलमध्ये टाकण्यासाठी आख्खे सरकार कामाला लागले पण…

नाशिक : मागील अडीच वर्षात भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या. आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मला देखील जेलमध्ये टाकण्यासाठी पूर्ण सरकार कामाला लागलं होतं पण मी यांच्या बापाला भीत नाही. हे काहीच करू शकले नाही. ज्यांच्यावर मला जेलमध्ये टाकायची जबाबदारी दिली होती ते जेलमध्ये गेले पण मी गेलो नाही, असा धक्कादायक आरोप उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांनी नाशिक (Nashik) येथील पदाधिकारी मेळाव्यात केला.

नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची (BJP Meet)बैठक पार पडली. आजच्या समारोपाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ‘जनतेची सेवा करता येईल यासाठी आपण ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सुरु केली आहे. पण त्यांना भीती होती की आपलं तीन पायाचं सरकार कधी गडगडेल हे सांगता येत नाही. यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराची ट्वेंटी-ट्वेंटी मॅच खेळली आणि रोज भ्रष्टाचार केला. महाराष्ट्राने यापूर्वी कधीही एवढा भ्रष्टाचार पाहिला नव्हता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

त्यांनी आगामी निवडणुकांसाठी भाजपचे मिशन 200 ची घोषणा केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) जोरदार निशाणा साधला. दुसरीकडे आगामी निवडणुकासांठी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केले. “समर्पण भावनेने सर्वांनी मैदानात उतरून काम करा. आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवा, आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे आपलं समर्पण आपल्या पक्षासाठी मी मागतो आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना केले.

Tags

follow us