Download App

सुषमा अंधारेंना ठोकणारच! ठाकरे गटाच्याच महिलेची धमकी : नगर कोर्टात हायव्होल्टेज ड्रामा

  • Written By: Last Updated:

नगर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी आज नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जाऊन वकिलांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला नेत्या स्मिता अष्टेकर (Smita Ashtekar) यांनी अंधारे यांना जोरदार विरोध केला. यावेळी त्यांच्या समवेत मनसे नेत्या अॅड. अनिता दिघेही होत्या. सुषमा अंधारे या हिंदू देवतांचा अपमान करीत आहेत. हा अपमान आम्ही सहन करणार नाही, अधारेंनी माफी मागावी, अन्यथा त्यांना हिसका दाखवू, असा इशारा स्मिता अष्टेकर यांनी दिला.

मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण; कायद्याचा मसुदा तयार : निवडणुकीपूर्वी CM शिंदे मोठा डाव जिंकणार?

मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद यात्रेनिमित्त सुषमा अंधारे सध्या नगर जिल्ह्यात आहेत. आज सकाळी त्यांनी दूध उत्पादक व शेतकरी यांची भेट घेतली तर दुपारी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बार रूममध्ये वकिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अंधारेंच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ झाला. ठाकरे गटासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्रमात घुसून निषेध केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्मिता अष्टेकर आणि अनिता दिघे यांनी सुषमा अंधारे यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. अंधारे यांनी घाणेरड्या भाषेत हिंदू देवतांचा अपमान केल्यानं त्यांनी माफी मागावी, अन्य़था चपलेने चोप दिला जाईल, असं या महिला पदाधिकाऱ्यांना ठणकावलं.

माझा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही
याबाबत बोलतांना अष्टेकर म्हणाल्या, मी एक कट्टर हिंदुत्ववादी महिला आहे. कट्टर हिंदुत्वादी बाळासाहेब ठाकरे यांची मी शिवसैनिक आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या जुन्या भाषणात हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांचा मी निषेध केला असून त्यांनी पुन्हा नगर मध्ये येऊन दाखवावे, त्यांना मी माझा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. पक्षाने त्यांना कोणत्या कारणाने पक्षात घेतले, याच्याशी मला काही घेणे देणे नाही. परंतु जर आमच्या देवदेवतांचा अपमान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, असे अष्टेकर म्हणाल्या.

अंधारे यांच्या कार्यक्रमाला आपण विरोध करणार असल्याची पूर्वकल्पना आपण ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना दिली होती, असे स्मिता आष्टेकर यांनी स्पष्ट केले. तर मनसेच्या वकील अनिता दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची, प्रधान जिल्हा न्यायाधीशांनाची परवानगी घेण्यात आली नव्हती. पूर्वकल्पना न देता त्या न्यायालयातील बाररुमध्ये आल्या. राजकीय व्यक्तीचे बारमध्ये काय काम? असा सवाल दिघे यांनी केला.

हा राजकीय स्टंट – अंधारे
दरम्यान, अष्टेकर व दिघे यांच्या विरोधामुळे कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. पोलिसांनी त्यांना बाररूममध्ये जाण्यापासून रोखले. यानंतर पोलीस संरक्षणात कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी मनसेचे काही जण राजकीय अभिनवेश दाखवत राजकीय स्टंट करत आहे, त्या शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, असा आरोप केला.

 

follow us