Indian Army Soldier Martyred : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावाचे शूर सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर (Sandeep Gaiker) हे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी शहीद झालेत. ते भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये (Maratha battalion) जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत होते. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका (Akole Taluka) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar)जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.
सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मोबाईल नंबरवर UPI करू शकणार नाही; कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणवाडा गावातील जवान संदीप पांडुरंग गायकर हे गेल्या सात वर्षांपासून सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करू ते सैन्य दलात दाखल झाले होते. निष्ठेने कर्तव्य बजावत असताना
२१ मे रोजी रात्रीच्या सुमाराला जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली. शोध मोहिमेदरम्यान त्यांना वीरमरण आल्यानं संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव, अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता सहापदरी होणार; राज्य शासनाची मंजुरी, खासदार कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश
गायकर हे अतिशय शिस्तबध्द, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. सैन्यात निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि धैर्याने सेवा बजावली. ते शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या सुरक्षेसाठी लढत राहिले. दरम्यान, संदीप गायकर यांच्या कुटुंबात आईवडील, पत्नी आणि मुलगी आहे. गायकर यांच्या पार्थिवावर उद्या (२३ मे) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पहलगाम हल्ल्याला एक महिना पूर्ण
जम्मू आणि काश्मीरमध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर क्रुर हल्ला कला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला जाला. चार दहशतवादी जंगलातून पहलगामच्या बैसरन खोऱ्यात घुसले आणि पर्यटकांचा धर्म विचारत त्यांनी १५ मिनिटे अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जण ठार झाले. या घटनेला एक महिना झाला आहे, सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत, परंतु चार क्रूर दहशतवाद्यांना अजूनही पकडता आले नाही.
दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम…
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्यदलानं मोठी मोहिम सुरू केली. १५ मे रोजी दक्षिण काश्मीरमधील शोपियान येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले.