तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता सहापदरी होणार; राज्य शासनाची मंजुरी, खासदार कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश

Talegaon-Chakan-Shikrapur road to be six-lane; State government approval, MP Kolhe’s pursuit successful : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर (रा.मा.548 डी) या राष्ट्रीय महामार्गावरील एलिव्हेटेड रस्त्यासाठी सुरू असलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य शासनाने मंजुरी दिल्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचे केंद्र बनलेल्या या महामार्गाच्या विकसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रुम नंबर 102, दोन कोटी अन् गोटेंनी डाव उधळवला; खोतकरांचा माणूस अडकला
तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे मागील 5-6 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. खराब व अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघात पाहता या रस्त्याचे चौपदरीकरण व उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रस्ता) बांधण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी आग्रह धरल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने डिसेंबर 2024 मध्ये या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती.
धुळे रोकड प्रकरण, कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित; सभापती राम शिंदेंचा मोठा निर्णय
निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकारने हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडे (MSIDC) हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने तळेगाव चाकण शिक्रापूर, पुणे शिरुर आणि हडपसर ते ऊरळीकांचन हे तीनही महामार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाला हस्तांतरित केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे भवितव्य अधांतरी झाले होते.
संजय राठोड पुन्हा अडचणीत, पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा भाजप आमदाराचा आरोप
तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम रखडल्यामुळे चाकण व आसपासच्या गावांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या डीपीआरनुसार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने हा महामार्ग बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेरीस 22 एप्रिल रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर तळेगाव ते चाकण दरम्यान चौपदरी रस्ता व उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रस्ता) आणि चाकण ते शिक्रापूर दरम्यान सहापदरी रस्ता बांधण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार बीओटी तत्त्वावर हा महामार्ग बांधण्यात येणार असून राज्य शासनाने तरतूद केलेल्या अपफ्रन्ट रकमेतून चौपदरी व सहापदरी रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. वस्तु व सेवा कर आणि गौण खनिज वगळून या महामार्गाच्या विकसनासाठी सुमारे रु. 3923.89 कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
पती घरी नसताना मारहाण अन्…, हगवणे कुटुंबाबाबत मोठ्या सूनेचा धक्कादायक खुलासा
यामध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर रा.मा. 548डी, दकमी 0/00 ते दकमी 53/200 मधील अ) तळेगाव ते चाकण सा.क्र. दक.मी. 0/00 ते 28/300 लांबीमध्ये चार पदरी उन्नत मागग व जमिनीस समांतर चारपदरी रस्ता व ब) चाकण ते शिक्रापूर सा.क्र.दक.मी. 28/300 ते 53/200 या लांबीमध्ये, जमीनीस समांतर सहा पदरी रस्ता करणे, सन 2008 च्या पथकर धोरणानुसार म्हणजेच सवग प्रकारच्या वाहनांवर पथकर आकारण्यात येईल. त्याचबरोबर या जीआरमध्ये इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या कामाचे शासन आदेश निर्गमित झाल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाधान व्यक्त करीत राज्य शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे हा महामार्ग तातडीने बांधावा अशी मागणी मी सातत्याने करीत होतो. या मागणीला यश आले याचे समाधान असून आता राज्य शासनाने रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
अजित पवार हे गुंडांच्या टोळीचे आका आहेत का? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
तसेच एमएसआयडीसीने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून हा राष्ट्रीय महामार्ग अपघात आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरुच राहणार असल्याचे सांगत खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे शिरुर आणि हडपसर ते ऊरळीकांचन या दोन्ही महामार्गांबाबतही शासनाने तातडीने आदेश निर्गमित करावेत अशी विनंती केली आहे.