सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मोबाईल नंबरवर UPI करू शकणार नाही; कारण काय?

सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मोबाईल नंबरवर UPI करू शकणार नाही; कारण काय?

UPI Blocked : देशात होणारी डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) आता एक नवीन प्रणाली सुरु केली आहे. या नवीन प्रणाली अंतर्गत काही मोबईल नंबरवर यूपीआय व्यवहार (UPI Transactions) करता येणार नाही. केंद्र सरकारने काही नंबर ब्लॉक केले आहे. त्यामुळे आता या मोबाईल नंबरवर यूपीआय मार्फत पेमेंट होणार नाही.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मोबाईल नंबर सायबर फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे किंवा ज्यांचे वर्तन संशयास्पद आढळून आले आहे आणि ज्या नंबरावरुन चुकीची केवायसी केली किंवा फेक क्युआर कोडशी संबंध असणाऱ्या मोबाईल नंबरवर आता यूपीआय मार्फत पेमेंट करता येणार नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात फेक क्युआर कोड, बनावट युपीआय हँडलमार्फत फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता सरकारने लोकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन प्रणाली काय आहे?

या नवीन प्रणालीनुसार, काही मोबाईल नंबर सरकारने तक्रारीनुसार, मध्यम, उच्च श्रेणीत ठेवले आहे. या नंबरवरील यूपीआय व्यवहार ब्लॉक करण्यात येणार आहे. माहितीनुसार, जर एखाद्या मोबाईल नंबरबाबत फसवणुकीच्या तक्रारी येत असेल किंवा तो वारंवार नंबर नवीन मोबाईलमध्ये वापरत असेल तर अशा नंबरना संशयित मानून या नंबरांवर यूपीआय व्यवहार ब्लॉक करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

धुळे रोकड प्रकरण, कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित; सभापती राम शिंदेंचा मोठा निर्णय

याचबरोबर चुकीचे केवायसी तपशील दिले गेले असेल किंवा ओटीपी/यूपीआय पिन वारंवार फेल होत असेल तर अशा नंबरवर देखील यूपीआय व्यवहार ब्लॉक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यूपीआय पेमेंट ब्लॉक म्हणजे या नंबरांवर पेटीएम, फोनपे, गुगल पे आणि बँकेच्या ॲप्समधून पेमेंट होणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube