Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर एसटीच्या आगराच्या सुप्याच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या चालकास पारनेर बस आगारातून बाहेर पडताच काही क्षणात अचानक झटका आल्याचा धक्कादायकप्रकार घडला आहे. हा बस चालक गाडीच्या स्टिअरींगवर अचानक कोसळला व शरीरास झटके देऊ लागला. हा प्रकार घडल्याने सुप्याकडून येणाऱ्या बसला त्या गाडीची धडक बसली. परंतु बस धडक देऊन पण आणखी पुढे गेली. (ST Bus Driver Attacked while driving bus in Ahmednagar )
पोलीस पाटील, कोतवाल पदभरती घोटाळ्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह दोन बडे अधिकारी निलंबित
हा प्रकार प्रवाशांच्या व बसच्या वाहकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ बस थांबवण्यास प्रयत्न केले. तसेच सुपा रोडवरील काही दुकानदारांनी प्रसंगावधान दाखवत चालत्या बसकडे धाव घेतली. या बसच्या चालकास तात्काळ खाली घेऊन त्याला शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.
रिक्षावर ‘नाव’ पाहून पवार भारावले; कार्यकर्ताही म्हणाला ‘आषाढीच्या दिवशी विठ्ठल भेटला’
यावेळी उपस्थित दुकानदार यांनी चालकाला शुध्दीवर आणण्यास छाती दाबून प्रयत्न केले. त्यांच्या प्रसंगावधानाने थोड्या वेळात चालक शुध्दीवर आला व पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. सुपा रोडवरील सर्व दुकानदारांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाने सर्वांच्यावर येणारा अनर्थ टळला.
त्यानंतर प्रवाशांनी आणि आजूबाजूच्या दुकानदारांसह तेथे असणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्वच दुकानदारांच्या कृतीचे सर्वत्र या कृतीने कौतुक होत असून राजू खोसे यांच्या कृतीने चालकाचे प्राण वाचले. असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.