रिक्षावर ‘नाव’ पाहून पवार भारावले; कार्यकर्ताही म्हणाला ‘आषाढीच्या दिवशी विठ्ठल भेटला’

रिक्षावर ‘नाव’ पाहून पवार भारावले; कार्यकर्ताही म्हणाला ‘आषाढीच्या दिवशी विठ्ठल भेटला’

रिक्षेवर ‘नाव’ पाहुन पवार भारावले; कार्यकर्ताही म्हणाला ‘आषाढीच्या दिवशी भेटला विठ्ठल’

Sharad Pawar Meet Fan : अनेक सेलिब्रेटींचे असतात तसेच राजकीय नेत्यांचे देखील प्रचंड चाहते असतात. याचाच प्रत्यय आला तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक चाहता पाहून. या चाहत्याला थेट शरद पवारांनी भेट दिली आहे. हा चाहता एक रिक्षावाला आहे. त्याने त्याच्या रिक्षावर ‘द बिग फॅन ऑफ शरद पवार’ असं लिहिलेलं आहे. त्याला भेट दिल्यानंतर पवारांनी त्याच्याशी संवाद साधला. (Sharad Pawar shock after saw his name on Auto Rickshaw fan says met Vittal on Ekadashi )

मी गुगली टाकून पूर्ण सत्य बाहेर आणणार ! फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रिक्षावाला चाहता आणि शरद पवार यांच्यातील संवाद…

या रिक्षावाल्याने सांगितले की, मी ही रिक्षा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रवाशांना मोफत प्रवास ठेवतो. त्यावर शरद पवार म्हणाले की, बॅंकेचं कर्ज किती आहे. तो म्हणाला कर्ज फिटले आहे. तसेच या रिक्षावाल्याने शरद पवारांना राजीनामा मागे घ्यावा म्हणून रक्ताने पत्र लिहिलं होतं. मी मांजरसुंबाजवळील रहिवासी आहोत. तसेच कोरोना काळात आपण पूर्ण काळ प्रवाशांना मोफत प्रवास ठेवला होता. रिक्षावर माग तुमचा बॅनर लावला होता. त्यावर पवार मिश्किलपणे म्हणाले की, पैसे कुठून आणले? बरेच पैसे आहेत. चांगलं आहे.

राजकारणातील आदर्श कोण? गडकरींनी घेतलं ‘या’ कम्युनिष्ट नेत्याचे नाव

कोण आहे हा रिक्षावाला?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हा चाहता असलेला रिक्षावाल्याचं नाव संदीप काळे असं आहे. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. तर शरद पवारांचा चाहता असल्याने त्याने रिक्षावर ‘द बिग फॅन ऑफ शरद पवार’ असं लिहिलेलं आहे. तसेच तो वर्षभरापासून शरद पवारांची या रिक्षामध्ये बसण्यासाठी वाट पाहत होता. तसेच या रिक्षावाल्याने शरद पवारांना राजीनामा मागे घ्यावा म्हणून रक्ताने पत्र लिहिलं होतं.

यावेळी या रिक्षावाल्याने आपल्याला शरद पवारांनी रिक्षावरील कर्जाबद्दल विचारपूस केली. आपलं कौतुक केलं. याचं समाधान व्यक्त केलं. तसेच पवार मला आज आषाढी एकादशीच्या दिवशी भेटले. हा दिवस माझ्यासाठी चांगला होता. कारण साहेब आमच्यासाठी विठ्ठल आहेत. अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube