Aashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. त्यातच अनेक भाविक हे एसटीच्या बसेसने देखील पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला येतात. मात्र अनेकदा एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र यावर आता या वारकर्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्यावतीने पंढरपुरसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. (ST increase Buses for Aashadhi Wari )
दरम्यान अहमदननगरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुर येथे जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानक येथून एस.टी.बससेची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने माळीवाडा येथील वाहतुक नियंत्रक यांच्याशी चर्चा करण्यात आली. शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, उपशहरप्रमुख शरद कोके, सुरेश क्षीरसागर, जालिंदर कुलट, वाहतुक नियंत्रक ए.एम.तोटे आदि उपस्थित होेते. यावेळी विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांच्याशीही दूरध्वनीवरुन याबाबत चर्चा करण्यात आली असता, माळीवाडा बसस्थानक येथून बस सोडण्याचे आश्वासन दिले.
बारामतीकरांना कुणाची भाषा समजली? ‘त्या’ विधानाची आठवण करुन देत पवारांना शिंदेंचा चिमटा
संभाजी कदम यांनी सांगितले की, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. अनेक दिंडी मार्गस्थही झाल्या आहेत. त्याचबरोबर अनेक लोक हे एस.टी.बसेसने पंढरपुरला विठूरायाच्या दर्शनाला जात आहेत. या वारकर्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्यावतीने पंढरपुरसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
परंतु माळीवाडा एस.टी.स्टॅण्ड येथून पंढरपुरला जाण्यासाठी बस नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. नगर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक एस.टी.बसेस या माळीवाडा बसस्थानक येथे येत असल्याने पंढरपुरला जाण्यासाठी येथून बस नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चा केली व अधिकार्यांनी माळीवाडा बसस्थानक येथून बस सोडण्याची व्यवस्था करु, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर बसस्थानक परिसराची स्वच्छता करण्यात यावी, नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, फोन कायम सुरु ठेवून नागरिकांना माहिती देण्यात यावी, आदिंसह बसस्थानकातून सुविधा देण्यात याव्यात, असेही संभाजी कदम यांनी सांगितले.
भगवान फुलसौंदर यांनीही शासनाच्यावतीने पंढरपुरला जाणार्या भाविकासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु माळीवाडा बसस्थानकातून बस नसल्याने वारकर्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. पुन्हा तारकपुर येथे जाण्यासाठी खर्च येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त होत होती. याबाबत विभागीय नियंत्रकांशी चर्चा करुन या ठिकाणीहून बस सोडण्याची विनंती मान्य केल्याने नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले.