Download App

सुधाकर बडगुजरांची दोन तास चौकशी, एसबीच्या प्रश्नांना समाधानकारण उत्तरं नाही?

  • Written By: Last Updated:

Sudhakar Badgujar Investigation : ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुज (Sudhakar Badgujar ) यांचा दाऊतचा हस्तक सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. भाजप आमदार नितेश राणेंनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळं बडगुजर अडचणीत आले होते. या प्रकरणी त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असतांनाच त्यांच्यावर एसीबीने (ACB) पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आता एसीबीने त्यांची चौकशी सुरू केली आहे.

‘मुलभूत अन् अर्थिक धोरणांमुळेच विकासाला गती’; गडकरींनी सांगितला विकासाचा फॉर्मूला 

पदाचा गैरवापर करून आपल्याच कंपनीला कंत्राट दिल्याप्रकरणी बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात एसीबीने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये बडगुजर महापालिकेत कार्यरत असताना त्यांनी त्यांच्या जवळच्या कंपनीला काही कंत्राटे दिली होती. यात मोठ्या प्रमाणात पदाचा गैरवापर झाला होता. दरम्यान, आज बडगुजर यांची दोन तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ऋतुराज कसोटी मालिकेतून बाहेर, विराटही मायदेशी परतला; नेमकं कारण काय? 

बडगुजर म्हणाले की, चौकशीत विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिक आणि सकारात्मक उत्तर देली. शिवाय, काही इव्हेडन्सही एसीबीला दिली. कोर्ट ऑर्डरच्या कॉपीची प्रतही दिली. त्याचा अभ्यास ते करत आहे. माहिती अधिकारात काही माहिती मागवली असल्याचं त्यांना सांगितलं. आता पुढच्या दहा तारखेला पुन्हा चौकशी होणार आहे, असं बडगुजर म्हणाले.

प्रकरण काय आहे?

एसीबीने दिलेल्या तक्रारीनुसार, बडगुजर यांच्याविरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, फसवणूक आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2006 मध्ये नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात एसीबीकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत समोर आल्यानुसार, सुधाकर बडगुजर यांनी डिसेंबर 2006 मध्ये बडगुजर अँड कंपनीतून निवृत्ती घेतल्याबाबतची खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर 2007 पासून नाशिक महापालिकेत नगरसेवक व अन्य पदे भूषविताना बडगुजर अँड कंपनीने नाशिक महापालिकेकडून विविध कंत्राटे मिळविल्याचा आरोपही करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात पदाचा गैरवापर करून गैरव्यवहार झाला. त्यानंतर एसीबीने गुन्हा दाखल केला.

दरम्यान, आता पुढच्या चौकशीत काय समोर येतं हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us