ऋतुराज कसोटी मालिकेतून बाहेर, विराटही मायदेशी परतला; नेमकं कारण काय?
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याआधी विराट कोहली (Virat Kohali) भारतात परतला आहे. कोहली कौटुंबिक कारणामुळे परतला आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कसोटी मालिकेतून बाहेर आहे. गायकवाड दुखापतग्रस्त असून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे.
Cricbuzz ने दिलेल्या माहितीनुसार, कोहली कौटुंबिक कारणामुळे भारतात परतला आहे. मात्र कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे कोहली लवकरच आफ्रिकेत परतणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यात तो संघात असणार आहे. कोहलीने तीन दिवसांपूर्वी भारतात येण्याची परवानगी घेतली होती. भारतात परतल्यामुळे तो सरावात सहभागी होऊ शकला नाही.
IND vs SA : टीम इंडियाचा पराक्रम! आफ्रिकेला धूळ चारत मालिकाही जिंकली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ऋतुराजला दुखापत झाली होती. त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. गायकवाड दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. सध्या त्याच्या दुखापतीवर बीसीसीआयची मेडिकल टीम काम करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे आणि तोपर्यंत दुखापतीतून सावरू शकणार नाहीत. याच कारणामुळे गायकवाडला संघातून वगळण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचे वर्चस्व, गोलंदाजांनंतर फलंदाजीही दमदार
विराट कोहली विश्वचषक 2023 नंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माही कसोटी मालिकेत कर्णधाराच्या भूमिकेत आहे. या मालिकेसाठी भारताने युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांचाही संघात समावेश केला आहे. ऋतुराजलाही संधी मिळाली. मात्र दुखापतीमुळे तो बाहेर आहे. इशान किशनलाही स्थान देण्यात आले. मात्र ईशानने या मालिकेतून आपले नाव काढून घेतले होते. त्यामुळे त्याच्या जागी केएस भरतला टीम इंडियात स्थान देण्यात आले.