Download App

राजकीय स्टंटपेक्षा एमआयडीसी रोजगार देईल का? हे जनतेसमोर ठेवा; खासदार विखेंचा रोहित पवारांना टोला

Karjat–Jamkhed MIDC : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात सर्वाधिक चर्चेचा व गाजलेला विषय म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड एमआयडीसी होय. मात्र हा विषय अद्यापही प्रलंबित असल्याने याप्रश्नी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली. माझी एक विनंती आहे की, उद्योगमंत्र्यांनी कर्जत जामखेड एमआयडीसी प्रश्न नगर जिल्ह्यातील जनतेला आश्वासित करावे एमआयडीसी झाल्यावर किती नवे प्रकल्प त्या ठिकाणी सुरू होणार आहे? औद्योगिक प्रकल्पांचे अर्ज आपल्याकडे आलेले आहेत. जेणेकरून जनतेला विश्वास बसेल कोणताही राजकीय स्टंट नसून खरंच एमआयडीसी आल्याने रोजगार उपलब्ध होईल. असे पुरावे त्यांना जनतेसमोर ठेवावे लागेल तरच जनता विश्वास ठेवेल. ( Sujay Vikhe criticize Rohit Pawar on Karjat–Jamkhed MIDC)

महाराष्ट्रात भाजप अन् काँग्रेसला मिळणार नवे बॉस! निवडणुकांपूर्वी दिल्लीतून होणार मोठे बदल

पुढे ते म्हणाले कर्जत जामखेड येथील एमआयडीसी प्रश्नावरती आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी यावर उत्तर देत आहेत. सध्या जोरात चालू आहे. त्या ठिकाणच्या दोन्ही आमदारांनी संबंधित एमआयडीसीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. या एमआयडीसी बाबत कागदपत्रांची पूर्तता वगैरे झाली आहे. मी खासदार या नात्याने सांगतो एमआयडीसी येणे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? अजितदादांच्या गटातील नेत्याच्या उत्तराने खळबळ!

मात्र एमआयडीसी येण्यापूर्वी किती उद्योग तिथे येणार आहेत? अर्ज आपल्याकडे आले आहेत का? एमआयडीसी आल्यावर ती आम्ही तिथे आमचा प्रकल्प घेऊन येऊ असे काही अर्ज आपल्याकडे आले आहेत का? आम्ही मोठी गुंतवणूक असे काही अर्ज आपल्याकडे आले आहेत का? कारण की, आपण नगर जिल्ह्यातील काही एमआयडीसी पाहिल्या उदाहरणार्थ श्रीरामपूर घोडेगाव राहुरी या ठिकाणी एमआयडीसी झाल्या. मात्र त्या ठिकाणी उद्योग काही आला नाही माझा असं मत आहे की, या वादावरती मला भाषण करण्याचे इच्छा नाही मात्र या विषयावर कोणीतरी बोलावं. अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे यांनी दिली.

एमआयडीसी जाहीर झाल्यानंतर तीन कंपन्या एमआयडीसीमध्ये आपला प्रकल्प घेऊन येण्यास तयार आहेत कंपन्यांची करार झालेला आहे. जेणेकरून जनतेला विश्वास बसेल, रोजगार निर्मितीची संधी लगेच उपलब्ध होईल. नाहीतर एमआयडीसी जाहीर होऊन त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प आला नाही तर ही जनतेच्या भावनेची फसवणूक केल्यासारखे होईल. म्हणून एमआयडीसी व्हावी याबाबत कोणताही विरोध नाही आज स्थानिक पातळीवरील विषय असून याबाबत दावेप्रति दावे हे होणारच आहेत यावर मी भाषे करणार नाही.

Tags

follow us