राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? अजितदादांच्या गटातील नेत्याच्या उत्तराने खळबळ!
Sunil Tatkare on NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार काही आमदारांसह सरकारमध्ये दाखल झाले. या राजकीय भूकंपानंतर पक्षात दोन गट पडले. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली आहेत. यानंतर अजित पवार गटाने पुढाकार घेत शरद पवार यांची भेट घेत त्यांन भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएत येण्याची विनंती केली होती. पण, शरद पवार यांनी ठाम नकार दिला.
त्यानंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. शरद पवार यांच्या भुमिकेवरून कदाचित दोन्ही गट एकत्र येणार नाहीत अशी शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
‘कुणी आमच्याकडं आलं तर आमचा दुपट्टा तयार’, बावनकुळेंकडून नव्या इनकमिंगचे संकेत
तटकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतात का हे पाहण्यासाठी काही काळापुरतं आपण थांबावं. काळाच्या ओघात याची उत्तरे नक्कीच मिळतील. तटकरे यांच्य या सूचक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
विरोधकांनी मणिपूरमध्ये जाऊ नये
मणिपूर येथे गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. विरोधी पक्षांचे खासदार मणिपूरमध्ये जात आहेत. यावरूनही तटकरे यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. मणिपूरमध्ये विरोधी खासदारांना जाण्याचा अधिकार नाही. मणिपूरमधला हा विषय अतिशय संवेदनशील आहे. लोकसभेत त्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.
LetsUpp Special : पवार पुन्हा भिजणार की ठाकरे डरकाळी फोडणार ?
उद्धव ठाकरेंना तो अधिकार आहे
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आज मुंबईत उद्धव ठाकरे गटाचा हिंदी भाषकांचा मेळावा होत आहे. उद्धव ठाकरेंचा तो अधिकार आहे. महायुतीत आम्ही समन्वय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे शिवसेना यांचे एकूण 12 सदस्य या समितीत आहेत. त्यामुळे आता महायुतीच्याही एकत्रित सभा लवकरच होतील, असे तटकरे म्हणाले.