Download App

BJP Candidate List : सुजय विखे हे राम शिंदे यांना ठरले भारी

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपने (BJP) लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे-पाटी (Sujay Vikhe-Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जवळपास शंभर उमेदवारांची दुसरी यादी घोषित केले असून यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत.

भाजपकडून दुसरी यादी जाहीर; मोहोळ, विखे, गडकरी, मुंडेंना उमेदवारी…

लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची पहिली यादी ही काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही नेत्याचे नाव नव्हते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचंही पहिल्या यादीत नाव नव्हतं. त्यानंतर आज तब्बल शंभर उमेदवारांची उमेदवारी भाजपने घोषित केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे देखील आहे. यामध्ये नगर दक्षिण मधून अखेर सुजय विखे यांची उमेदवारी घोषित झाली आहे.

मोठी बातमी : भाजपची दुसरी यादी जाहीर; पुण्यातून मोहोळ, नगरमधून सुजय विखे मैदानात 

शिंदेंचा पत्ता कट, विखे किंग मेकर
नगर दक्षिण लोकसभेसाठी गेल्या काही दिवसांपासून कोणाची उमेदवारी जाहीर होणार, याची प्रतीक्षा लागलेली होती. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान सुजय विखे यांची उमेदवारी ही प्रबळ मानली जात होती. मात्र शिंदे यांच्या एंट्रीने विखे यांची कोंडी निर्माण झाली होती. भाजपकडून धक्का तंत्राचा वापर केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने सुजय विखे यांच्या मनात देखील धाकधूक होती. अखेर भाजपची दुसरी यादी आज जाहीर झाली. त्यात सुजय विखे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली. यामुळे राम शिंदे यांचा पत्ता कट झाला असून आता विखे हेच लोकसभसाठी किंगमेकर ठरले.

या खासदारांचं तिकीट कापलं
भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावे जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांना उमेजवारी नाकारली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापूरन त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं. तर त्यांच्या बहिण प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापण्यात आलं. ईशान्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन मनोज कोटक यांना धक्का दिला आहे. अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आले आहे.

follow us