भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक (Election) प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून राज्यात ७५ ठिकाणी नेत्यांची नियुक्ती केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
डॉ. विखे पाटील पूर्वी दक्षिण मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मधल्या काळात ते उत्तर भागातच जास्त सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दक्षिण भागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून पक्षाने त्यांना पुन्हा या भागात सक्रिय करण्याचे ठरविल्याचे दिसून येते. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले हयात असते तर कदाचित ही जबाबदारी त्यांच्याकडे असती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे घटनात्मक पदावर असल्याने त्यांच्याकडे थेट पक्षीय जबादारी दिली नसावी.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख निवडले आहेत. आहिल्यानगर जिल्ह्यातही महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. अहिल्यानगर दक्षिण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची निवडणूक प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळं स्पष्ट झालं आहे की आहिल्यानंगर जिल्ह्यात भाजपच नेतृत्व पुन्हा विखेंकडंच आलं आहे.
निवडणूक प्रमुख
अहिल्यानगर शहर : आमदार विक्रम पाचपुते
अहिल्यानगर उत्तर : माजी आमदार स्नेहलता कोल्हे
अहिल्यानगर दक्षिण : माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील.
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे.@RaviDadaChavan #BJP #Maharashtra pic.twitter.com/vpPv6F5izI
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 5, 2025
