Download App

सुजय विखेंना पराभव अमान्य : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लाखो रुपये भरुन करणार चौकशी

सुजय विखे पाटील यांनी 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची चौकशी करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे.

Image Credit: letsupp

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे (BJP) उमेदवार आणि माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा 28 हजार मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विखेंना आस्मान दाखवले. हा निकाल लागून आता 15 दिवस झाले आहेत. पण विखेंनी अजूनही हा पराभव स्वीकारलेला नाही. त्यांनी थेट ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका घेतली असून 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची चौकशी करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी त्यांनी सुमारे 18 लाख रुपयेही भरले असल्याचे समोर आले आहे. (Sujay Vikhe Patil has filed an application to investigate EVMs at 40 polling stations.)

मिळालेल्या माहितीनुसार, सुजय विखे यांनी 10 जून रोजीच 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यात श्रीगोंदाचे 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत-जामखेड 5, राहुरी 5 अशा एकूण 40 केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी विखे यांनी केली आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्राचे जीएसटीसह 47 हजार 200 रुपये याप्रमाणे 18 लाख 88 हजार रुपये शुल्कही त्यांनी भरले आहे. नियमानुसार, निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असते. त्यानुसार डॉ. विखे पाटील यांनी १० जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली.

 

follow us

वेब स्टोरीज