Download App

निवडणुकांपूर्वीच विखेंचे नगरकरांना मोठे गिफ्ट! रस्ते विकासासाठी ‘एवढा’ निधी मंजूर

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – येत्या काळात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. दरम्यान लोकसभेपूर्वीच खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नांमुळे नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar road) रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी विखे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिली आहे.

बारामतीतील नमो रोजगार मेळावा एक जुमला होता; सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका 

यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले, मंजूर निधीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ते आष्टी ते जामखेड (NH 561) राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण काँक्रीटीकरण कामासाठी 651.15 कोटी रुपये, बेल्हा ते शिरूर 38 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 386.16 कोटी आणि श्रीगोंदा शहरातील काष्टी- श्रीगोंदा- आढळगाव रस्त्यावर लेंडी नाला पुलाच्या बांधकामासाठी 10.55 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सुजय विखेंनी सांगितले.

‘सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरीतांना बाहेर काढणार’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, रस्त्यांच्या विविध कामांसाठी नागरिकांनी वेळोवेळी माझ्याकडे मागणी केली होती. दरम्यान या मागणीवर योग्य तो पाठपुरावा केला आणि आज सदरील भरीव निधी हा या रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामासाठी प्राप्त झाला आहे. एक लोकप्रतिनिधी या नत्याने जेव्हा जेव्हा शासनाकडे पाठपुरावा करतो, तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतो, या गोष्टीचा खरंच अभिमान वाटतो.

प्रामाणिकपणे विकास कामे मार्गी लावणाऱ्या लोकप्रतिनिधीला कुठल्याही निधीची कमतरता भासत नाही. त्याची विकासकामे ही सर्वांना दिसत असतात. निश्चितच केंद्र शासनाच्या वतीने यापुढे देखील असा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यास मी सदैव कटिबध्द राहील. तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मी याप्रमाणेच तत्पर भूमिका घेत राहील असे, मत देखील यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले.

follow us