Download App

सुनंदा पवार यांचा बारामती लोकसभेबाबत खळबळजनक दावा! म्हणाल्या, शेवटच्या दोन-तीन दिवसांत…

बारामती लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा सुनंदा पवार यांनी केला आहे.

  • Written By: Last Updated:

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघातून रोज नवनवीन विषय समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्यानंतर ही सुरक्षा कोणत्या कारणाने दिली याबद्दल काही खुलासा बाहेर आलेला नाही. अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनीही मैदान गाजवलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांत अनोळखी लोक फिरताना दिसत आहेत. तसंच, ते वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

 

Rohit Pawar On Ajit Pawar : हाच का तुमचा स्वाभिमान?, अजित पवारांवर रोहित पवारांचा घणाघात

राजकीय ते कौटुंबीक संघर्ष

यंदा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय संघर्षासोबत कौटुंबीक संघर्षही जोरात सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा संघर्ष राजकीय असल्याचं बोललं गेलं. मात्र, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उतरवल्याने हा संघर्ष राजकीय ते कौटुंबीक असा झाला आहे. आता अजित पवार यांचं कुटुंब सोडलं तर पवार कुटुंबातील सर्व सदस्य सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसत आहेत.

 

प्रतिभा काकींनी काही सल्ले दिले

अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचराला सुरूवात केली आहे. त्यानंतर अजित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमचे थोरले बंधू लोकांची दिशाभूल करतात असं म्हणत रोहित पवार यांना हडपसरमधून निवडणूक लढवायची होती तेव्हा ते माझ्याकडे आले होते अशी आठवण त्यांनी सांगितली. मात्र, पवार साहेबांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर रोहितला प्रतिभा काकींनी काही सल्ले दिले असा खुलासाही अजित पवार यांनी केला आहे.

 

पार्थ पवार यांना थेट ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा! मात्र, सुरक्षा देण्याचं कारण काय?

पण आम्ही भाजपसोबत गेलो नाही

पहाटेच्या शपथविधीवरही वारंवार प्रतिदावे करण्यात आले आहेत. पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यामध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. मात्र, ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. परंतु, मी शब्द पाळला त्यामुळेच पहाटेचा शपथविधी झाला असा दावा अजित पवार यांनी केला होता. त्यावर आमच्या बैठका झाल्या पण आम्ही भाजपसोबत गेलो नाही. तसं, बैठका घेणं वेगळ आणि भाजपसोबत जाण वेगळ असंही पवार म्हणाले आहेत.

follow us