Download App

Supriya Sule : दुर्दैवाने महाराष्ट्रात असंवेदनशील सरकार; चौंडीतील आंदोलकांच्या भेटीनंतर सुळेंची टीका

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) चौंडी येथे आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून यशवंत सेनेचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोलताडे यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत.

Sujay Vikhe : खुर्चीसाठी ठाकरेंचीच गद्दारी! सुजय विखेंचा घणाघात

दुर्दैवाने महाराष्ट्रात असंवेदनशील सरकार…

या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे चौंडी येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच गेल्या सहा दिवसांपासून सरकार स्तरावर कोणताही अधिकारी त्यांना भेटण्यास आल्या नसल्यामुळे त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.

Maharashtra Politics : शिंदेंनंतर फडणवीसांची विकेट? अजितदादांच्या ‘त्या’ बैठकीने वाढली धुसफूस !

पुढे त्या म्हणाल्या की, हिंदू मुस्लिम आणि धनगर समाज यांना फक्त इलेक्शन आल्यावर आश्वासन द्यायचं आणि निवडणूक झाल्यावर विसरायचं ही जुमलेबाजी केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून सर्व समाज दुखावलेला आहे. उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणीतरी यायला हवं होतं मात्र ही गोष्ट दुर्दैवी आहे. की अद्यापही उपोषणकर्त्यांच्या भेटीला शासनाचा कोणताही मंत्री अथवा अधिकारी आलेला नाही. दुर्दैवाने असंवेदनशील सरकार महाराष्ट्रात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

धनगर आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी यशवंत सेनेने 6 सप्टेंबरपासून चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू केलं. संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे पाटील, बाळासाहेब दोलतडे, माणिकराव दांगडे (बारामती), अण्णासाहेब रूपनवार (माळशिरस), गोविंद नरवटे (लातूर), सुरेश बंडगर (परभणी), साधन पाटील (जळगाव) आदी सहभागी झाले आहेत.

Tags

follow us