Sujay Vikhe : खुर्चीसाठी ठाकरेंचीच गद्दारी! सुजय विखेंचा घणाघात

Sujay Vikhe : खुर्चीसाठी ठाकरेंचीच गद्दारी! सुजय विखेंचा घणाघात

Sujay Vikhe : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या भाजप (BJP) आणि शिवसेना यांनी युतीत लढल्या मात्र मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी म्हणून ठाकरेंनी गद्दारी केली आणि राज्यात सत्तेत आले. या सत्तेच्या काळात घरात बसून कारभार केला आणि राज्याला विकासापासून कोसो मैल दूर नेण्याचे पाप केले, अशी घणाघाती टीका भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केली.

Maharashtra Politics : शिंदेंनंतर फडणवीसांची विकेट? अजितदादांच्या ‘त्या’ बैठकीने वाढली धुसफूस !

पाथर्डी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना खा.विखे म्हणाले की, अहमदनगरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सातत्याने दिल्ली, मुंबई या ठिकाणी फिरत असतो त्यामुळे आपल्या घरगुती कार्यक्रमास येता येत नाही. मात्र याचा काहीजण उलट अर्थ काढून खासदारांचा जनसंपर्क नाही अशा वावड्या उठवत आहेत, मात्र मी जर विकासासाठी फिरलो नाही तर आपल्या भागासाठी निधी कसा येईल आणि तो कोण आपल्याला देईल? असा प्रतिप्रश्न करून सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी तुम्हाला विकास हवा आहे का? असे यावेळी विचारले.

तसेच यावेळी बोलताना खासदार सुजय विखे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. विखे म्हणाले, गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या युतीत लढल्या. मात्र मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि राज्यात सत्तेत आले. सत्ता आली मात्र ठाकरे यांनी आपल्या सत्तेच्या काळात घरात बसून कारभार केला. यामुळे राज्याचा विकासाची वाट खुंटली. मात्र राज्यात आता नव्याने महायुतीचे सरकार आले आहे. मागील एक वर्षात आपल्या भागाचा झपाट्याने विकास होत असून निधीची कुठल्याही बाबतीत कमतरता नाही. किंबहुना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) हे कमी पडू देणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

Diesel Vehicles महागणार! 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याची गडकरींची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube