Temptation to Teacher for Nashik Vidhan Parishad : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या (Nashik Vidhan Parishad) निवडणुकीसाठी येथे 26 तारखेला मतदान होणार आहे. मात्र तत्पूर्वी शिक्षक मतदारांना आकर्षिक करण्यासाठी उमेदवारांकडून विविध कृप्त्या शोधल्या जात आहेत. शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांना प्रलोभन दिली जात आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला असून शिक्षक मतदार संघात शिक्षकांना वस्तू वाटप होत असल्याबाबतची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, राधाकृष्ण विखेंचं जरांगेंवर टीकास्त्र
यामध्ये शिक्षकांना कपडे तसेच घरच्यांसाठी पैठणी व सोन्याची नथ अशी प्रलोभन दिली जात आहेत. लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही पार पडणार आहे. शिक्षकांबरोबरच राजकीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याला कुठेतरी पक्षीय वळण प्राप्त झाले आहे यातच शिक्षकांचे मतदान असलेले या निवडणुकीत शिक्षकांचे मते आपल्याला कसे मिळतील यासाठी उमेदवारांकडून आता संबंधितांना प्रलोभने दिली जात आहे. अशी प्रलोभना देणं चुकीचे आहे असे देखील काही उमेदवार म्हणत आहेत. आता याच प्रकरणी असलेले हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
मोठी बातमी ! नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद
काय मला पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये त्यांनी म्हटले की, नाशिक शिक्षक मतदार संघात सध्या निवडणूक सुरू असून मागील निवडणुकीत या मतदारसंघात शिक्षकांना पैठणी वाटप झाल्याचे तक्रार मी स्वतः नोंदवली होती मात्र कारवाई झाली नाही. यावर्षी देखील तोच प्रकार सुरू असून शिक्षकांना सफारीचे कापड महिलांना व पैठणी दिल्या जात असल्याच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहे.
याच बातमीच्या आधारे आपण तातडीने चौकशी करावी. धक्कादायक बाब म्हणजे उमेदवारांकडून थेट शाळेमध्ये जाऊन शाळेच्या वेळेतच या भेटवस्तू दिल्या जात आहेत अशी देखील चर्चा आहे. शाळेत जाऊन या भेटवस्तू देण्यापत एवढी मत होत असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांनी शाळांना भेट द्यावी व त्याचबरोबर सर्व मुख्याध्यापक यांना याबाबत शाळेत असे प्रकार घडल्यास त्यांनाही जबाबदार धरले जाईल असे निर्देश द्यावे. तसेच असे प्रलोभन वाटप करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई केली जावी अशी देखील मागणी कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.