Nashik Graduate Constituency : संगमनेरमध्ये तांबे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik Graduate Constituency  : संगमनेरमध्ये तांबे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये चर्चेतील उमेदवार म्हणजे सत्यजित तांबे (Styajit Tambe). तर आज मतदानाच्या दिवशी सत्यजित तांबे यांच्या परिवाराचे मतदान पार पडले आहे. त्यामध्ये सत्यजित यांचे वडिल डॉक्टर सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe), आई दुर्गा तांबे आणि पत्नी मैथिली तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क बजावला आहे.

यावेळी सत्यजित यांचे वडिल डॉक्टर सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया दिली की, गेल्या 15 वर्षांपासून मी या मतदारसंघाचा आमदार होतो. माझी अपक्ष म्हणून या मतदारसंघात सुरूवात झाली आहे. तेव्हाही मला अनेक पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनाही तसाच पाठिंबा मिळणार आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र यावेळी त्यांनी भाजपच्या पाठिंब्याविषयी विचारले असता त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज (दि.30) मतदान होत आहे. नाशिक (Nashik)आणि अमरावती (Amravati)या विभागात पदवीधर तर औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur)तसेच कोकण (Kokan)या शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. मतदारांना सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आज मतदान झाल्यानंतर येत्या 2 फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना होणार असल्याचं दिसून येतंय. नाशिक आणि नागपूर विभागाच्या मतदारसंघांत चुरस चांगलीच वाढल्याचं पाहायला मिळतंय. पाच जागांसाठी होणाऱ्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. आता या मतदारसंघात कोणता बाजी मारणार हे 2 फेब्रुवारीलाचं समजणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube