शिर्डीत शिवसैनिक नजरकैदेत…संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाच धारेवर धरलं

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघ दौऱ्यादरम्यान शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

sanjay raut

sanjay raut

Sanjay Raut : ठाकरे गटाचे सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे. बंडखोरीनंतर वाकचौरे पहिल्यांदाच शिर्डीत दाखल झाले. या दौऱ्यावरुन आता नवा पेटला आहे. वाकचौरे शिर्डीत दाखल होण्याआधीच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोस्ट शेअर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरलंय.

खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे गंभीर आरोप करत म्हटले की, “शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहाता पोलिस स्टेशनला शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवणे ही सरकारची झुंडशाही आहे! (डरपोक गद्दार) भाऊसाहेब वाघ चौरे यांनी गद्दारी केल्यानंतर आज प्रथमच शिर्डी येथे आले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ! त्यांना कोणीही जाब विचारू नये, म्हणून सकाळी १० वाजल्यापासून शेकडो शिवसैनिकांना शिर्डी पोलिस स्टेशन, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, संगमनेर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, राहाते पोलीस स्टेशन येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती देण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा

फडणवीस गद्दार खासदार ज्या रस्त्याने प्रवास करत आहेत, ते रस्ते पूर्णपणे बंद करून ठेवण्यात आले आहेत. अहिल्यनगर पोलिसांना शिवसैनिकांना अटकेत ठेवण्याचे आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत का? ही सरकारी दहशत आहे का? उघडपणे फिरण्याची हिम्मत नाही, तर गद्दारी केली कशाला? अहिल्यानगर पोलिसांनी तत्काळ सर्व शिवसैनिकांना सोडावे! एसपी मुंमांका सुदर्शन यांना विशेष विनंती – ही अन्याय्य कारवाई थांबवा. असे ते यावेळी म्हणाले.

मान्सूनची एन्ट्री पण शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेपर्यंत पेरणी करु नका; जाणून घ्या हवामान विभागाचा इशारा

उद्धव ठाकरे गटातून सहा खासदारांनी बाहेर पडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आधीच ढवळून निघाले आहे. अशातच शिर्डीतील कथित नजरकैद प्रकरणामुळे आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे.

Exit mobile version