Sanjay Raut : ‘सरकारला भीमा-कोरेगाव सारखी पेटवा-पेटवी व्हावी असं वाटतयं’

Sanjay Raut : भीमा-कोरेगाव सारखी पेटवा-पेटवी व्हावी, असं सरकारला वाटतंय, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केली आहे. संजय राऊत आज अहमदनगर दौऱ्यावर होते. श्रीगोंद्यातील ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; […]

अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र

Sanjay Raut

Sanjay Raut : भीमा-कोरेगाव सारखी पेटवा-पेटवी व्हावी, असं सरकारला वाटतंय, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केली आहे. संजय राऊत आज अहमदनगर दौऱ्यावर होते. श्रीगोंद्यातील ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राऊत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; प्रकाश सोळंके ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटले?

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. सध्या महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. राज्यातील परिस्थिती बिघडवी व भीमा-कोरेगाव सारख्या दंगली राज्यात निर्माण व्हाव्यात यासाठी सरकार सध्या पेटवा पेटवी करत असे सध्या वाटू लागले आहे, अशी शंका यावेळी खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Maratha Reservation चा लढा विखेंच्या बालेकिल्यात तीव्र… शिर्डीमध्ये पुकारला बंद

तसेच आमदार अपात्रतेबाबत अद्यापही निर्णय प्रलंबितच आहे. देशाची घटना, सर्वोच्च न्यायालय यांना आम्ही जुमानातच नाही असे मस्तवाल धोरण सध्या राबवले जात आहे, हम करेसो कायदा… घटनेतला कायदा आम्ही मानत नाही असे धोरण सध्या राबवले जात आहे. तसेच आरक्षणाबाबत सध्याचे सरकार हतबल आहे तसेच ते गोंधळलेले आहे व सरकारची इच्छा नाही अशी जाहीर टीका यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मराठा समाजाच्या मृतदेहावर सरकार आरक्षण ठेवणार का? ठाकरेंचा संतप्त सवाल

सध्या राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आहे ते बेकायदेशीर सरकार असून ते सत्तेवर बसले आहे. पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचे लोक असायचे की कोणाच्याही जागेत घुसून आम्ही मालक आहोत असे सांगायचे. सध्याची मंडळी देखील बेकायदेशीररित्या सत्तेत आली आहे. मात्र अशा पद्धतीने घुसणाऱ्या त्या गुंडाचा देखील एन्काउंटर झाला होता असा टोला देखील यावेळी खासदार राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

दरम्यान, श्रीगोंदा येथे शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी खासदार संजय राऊत हे बोलत होते. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला. याचं मुद्द्यांवरुन संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.

Exit mobile version