लाजा वाटल्या पाहिजे भ XXXव्यांना; उशीरा चपाती दिल्याने साई प्रसादालयात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राडा !

Sai sansthan- या प्रकरणी श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालयात नोकरी करणारे जगन्नाथ सिताराम मुंढे यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली.

Bharat More Fir Shirdi

Bharat More Fir Shirdi

Sai sansthan : श्रध्दा व सबुरीचा मंत्र देणाऱ्या श्रीसाई बाबांच्या शिर्डीतील (Shirdi) संस्थानच्या प्रसादालयात दररोज हजारो भाविक जेवण करतात. परंतु चपाती उशीरा दिल्याच्या कारणातून उद्धव बाळसाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याने राडा केला आहे. अखेर या पदाधिकाऱ्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


14.70 कोटींचा निधी, खर्च फक्त 65 लाख! खासदार धैर्यशील मानेंच्या कामगिरीचा अहवाल समोर

ठाकरे गटाचे कोपरगावचे तालुकाध्यक्ष भरत मोरे हे काही जणांसह शिर्डीतील प्रसादालयात मंगळवारी दुपारी जेवायला गेले होते. जेवण करत असताना संस्थानच्या कर्मचाऱ्याकडून मोरे यांना चपाती देण्यास काहीसा उशीरा केला. त्यामुळे भरत मोरे हे चिडले. जेवण करत असताना अचानक मोठ-मोठ्याने ओरडून मला चपाती उशीरा का दिली ? येथे मुजोर लोक आहेत ! लाजा वाटल्या पाहिजे XXX ! बेशिस्त कर्मचारी मोबाईल पहात बसतात, माझे काम नाही म्हणतात असे म्हणत शिवी देवून कर्मचारी मदन मोहन सिंग यांना मारण्याचा प्रयत्न केला.

पत्रकारांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, संजय दिना पाटलांवर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

हिंदी भाषिकांना काम करुन देणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालयात नोकरी करणारे जगन्नाथ सिताराम मुंढे यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर भरत मोरे (रा.कोपरगांव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२,२२१ ,३५१ (२),३५२,३५६ (२),२९२,२९६, २२४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करत साईबाबा संस्थानची बदनामी केली, अशी फिर्यादही संस्थानकडून देण्यात आली आहे.

भरत मोरेंची सोशल मीडिया पोस्ट
मी कुठलाही आरडाओरडा केला नाही,ना कुणा कर्मचाऱ्यांना अडवले, ना त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला, याऊलट जेवणास बसलेल्या साईभक्तांनीही कर्मचाऱ्यांची हि दादागिरी पाहून कर्मचाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली…मी ताबडतोब झालेल्या प्रकाराबद्दल अर्ज केला आणि पोहोच पावती माझ्याकडे आहे, निकृष्ट दर्जाची चपाती, पापड ही साईभक्तांच्या आरोग्यास हानिकारक आहे. त्यासाठी जेवनाचा दर्जा आरोग्यदायी करावा असे अर्जात लेखी अर्ज संस्थानकडून दिला आहेत. तसेच माझ्याविरोधात खोटी फिर्याद दिली असल्याचा आरोप भरत मोरे यांनी केला आहे.

Exit mobile version