Thackray Groups Ex MLA Letter for Ahmednagar Vidhansabha Seat : अहमदनगर (Ahmednagar) विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी यासाठी आता नगर शहरातील ठाकरे गट सक्रिय झाला आहे. माजी आमदार तसेच दिवंगत नेते अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांनी मुंबई येथे जात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. नगर विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता माविआ मधील घटक पक्षांकडून आता विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र आघाडीमध्ये नगरची जागा ही राष्ट्रवादीकडे ही जागा ठाकरे गटाला सुटणार का हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
तिवसा मतदारसंघात भाजपची अग्निपरीक्षा! यशोमती ठाकूरांविरोधात उमेदवार कोण?
देशात लोकसभा निवडणुका पार पाडल्या. राज्यांमधील निवडणुकांचे कल पाहिला असता महाविकास आघाडीला चांगले यश संपादन करण्यात आले. तर दुसरीकडे या निवडणुकीत महायुतीला काहीसा फटका देखील बसला. दरम्यान लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी जोरदार सुरू झाली आहे. उमेदवारांकडून आता आपापल्या राजकीय पक्षातील वरिष्ठांशी भेटीगाठी घेत चर्चासत्र देखील सुरू झाले आहे. नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता आघाडीतील घटक पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
आईने जन्म दिला तर संगीताने… World Music Day निमित्त बी प्राकने व्यक्त केल्या भावना
जागा राष्ट्रवादीची मागणी ठाकरे गटाची
लोकसभा निवडणुकीमध्ये नगरदक्षिणेमधून गटाचे उमेदवार लंके हे निवडून आले. अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी कडून या ठिकाणी त्यांचे सीटिंग आमदार आहे त्या त्या ठिकाणी पुन्हा एकदा उमेदवार उभे केले जातील अशी चर्चा आहे. मात्र आता राष्ट्रवादीच्या या मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केली जात आहे. सेनेचे विक्रम राठोड यांनी संजय राऊत यांची भेट घेत ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी केली आहे.
विधानसभेवर भगवा फडकवणार
राऊत यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हणण्यात आले आहे की गेले 35 वर्षे नगर मतदार संघ ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्ष ठाकरे यांचे नेतृत्वाखाली दिवंगत नेते अनिल राठोड हे 25 वर्षे आमदार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर मनपावर चार वेळा शिवसेनेचा भगवा देखील फडकला होता. गेल्या विधानसभेत अनिल राठोड यांचा निसटता पराभव झाला. मात्र 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी एक दिलाने काम केल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके हे मोठे मताधिक्याने निवडून आले. यामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. तरी नगर शहर मतदारसंघ विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात यावी जेणेकरून नगर शहरात विधानसभेवर व महानगरपालिकेवरती भगवा फडकवू असे यावेळी पत्रामध्ये युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी म्हटले आहे.