Download App

लग्नास मुलगी न दिल्याचा डोक्यात राग, मुलाने मुलीच्या वडिलांचा केला निर्घृण खून

लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी मान्य न केल्याने तरुणाने मुलीच्या वडिलांचा खून केला. या प्रकरणात दोघांना अटकर केली आहे.

अहमदनगर Murder Case : लग्नासाठी वडील मुलगी देत नसल्याने संगमनेर येथील एका मौलानाने मित्रांच्या मदतीने मुलीच्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस तपासात ही दक्कादायक घटनेचा उलगाडा झाला आहे. विशेष म्हणजे राहायला घर नसल्याने या आरोपीला राहण्यासाठी जागा दिली अन त्यानेच घात केला. (murder) मोहम्मद जाहिद मोहम्मद युनूस मुलतानी (रा. सहारणपूर, उत्तर प्रदेश) असं या आरोपीचं नाव आहे. तर आहतेशाम इलियाज अन्सारी असं खून झालेल्या बेकरी व्यावसायिकाचं नाव आहे.

Gauri Lankesh Murder Case : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

विवाहास नकार दिल्याचा राग

आठ महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील मोहंम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी हा मौलाना चंदा मागण्यासाठी संगमनेर शहरात आला होता. तो जवळच्या एका मशिदीत मोलाना म्हणून काम करत असल्याने अन्सारी कुटुंबाने त्यास राहण्यास थोडी जागा दिली. या दरम्यान मोहमद याने अन्सारी यांच्या मुलीसोबत लग्नाची मागणी घातली. परंतु, त्यांनी नकार दिला. त्यानंतर तो अकोले तालुक्‍यातील देवठाण येथे मशिदीत मौलाना म्हणून काम करायला लागला. त्यानंतर तो कल्याणला गेला. मात्र विवाहास नकार दिल्याचा राग त्याच्या मनात होता.

अंगावर जखमा

दरम्यान 3 एप्रिल 2024 रोजी अन्सारी घराबाहेर गेले होते. ते दुसऱ्या दिवशीही घरी न आल्याने अन्सारी यांच्या पत्नीनं संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार दाखल केली होती. आहतशाम इलियास अन्सारी यांचा 24 एप्रिल 2024 रोजी मालदाड येथील जंगलात मृतदह सापडला. वैद्यकीय अहवालानुसार मयत अन्सारी यांच्या अंगावर जखमा आणि गळ्याभोवती दोरीने आवळल्याच व्रण असल्याने ही हत्या असल्याचं समोर आलं होत.  परंतु कोणताही सबळ पुरावा नसल्याने त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 अखेर एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा उलगडा; गडचिरोलीत नेमकं काय घडलं?

दोघांना अटक

मयताचा मृत्यू हा नैसर्गिक झाला नसून त्यांचा खून झाल्याचा संशय मयताच्या मुलाला होता. त्यामुळे मयताचा मुलगा जुनेद आहतेशाम अन्सारी (वय 21 ) याने फिर्याद देत म्हंटले की, सदर मौलानाशी माझ्या बहिणीचे लग्न लावून दिले नाही याचा राग येऊन आरोपींकडून माझ्या वडिलांचा खून केला असावा अशी शक्यता त्याने व्यक्त केली. त्यांनतर पोलिसांनी अधिक तपास सुरु केला. संगमनेर पोलीस पथकाने उत्तर प्रदेश येथे जाऊन मोठ्या शिताफिने मौलानाला व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

follow us