Best Bakery case : देशातील सर्वात निर्घृण हत्याकांड प्रकरणाचा निकाल; २ आरोपींची निर्दोष मुक्तता

Best Bakery case : देशातील सर्वात निर्घृण हत्याकांड प्रकरणाचा निकाल; २ आरोपींची निर्दोष मुक्तता

Best Bakery Case: बडोदा येथील बेस्ट बेकरी हत्याकांड (Best Bakery case) प्रकरणात मुंबईच्या विशेष न्यायालयाने (Mumbai Session court) २ संशयित आरोपींची निर्दोष मुक्तात केली आहे. हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल अशी या दोघांची नाव आहेत. मफत आणि हर्षद यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत खून, पुरावे नष्ट करणे आणि खुनाचा प्रयत्न यासह आरोप होते. दरम्यान, या खटल्यातील अन्य २ संशयित आरोपी जयंतीभाई गोहिल आणि रमेश उर्फ रिंकू गोहिल यांचा तुरुंगातच मृत्यू झाला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयाच्या आधारे हा खटला मुंबईत चालविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार १७ आरोपींविरुद्ध मुंबईत खटला चालवण्यात आला. यात आधी ९ आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेप ठोठावली होती. याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. यात पुन्हा ५ संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. तर संजय ठक्कर, बहादूरसिंग चौहान, सानाभाई बारिया आणि दिनेश राजभर यांची जन्मठेप कायम ठेवली होती.

मोठी बातमी : खंडाळा घाटात भीषण अग्नितांडव; चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघे जखमी

यानंतर तपास यंत्रणांनी अजमेर बॉम्ब ब्लास्ट खटल्यात अटक केलेल्या आरोपींचे धागेदोरे या प्रकरणात जुळल्यानंतर अन्य आरोपींविरोधात मुंबई सत्र न्यायालयात नव्याने खटला चालविण्यात आला होता. याच खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून यात दोघांना तुरुंगातच मृत्यू झाला तर दोघांची आज सत्र न्यायालयाने निर्देष मुक्तता केली आहे.

काय घडलं होतं बडोद्यामध्ये?

गुजरातमधील २००२ च्या गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये बडोद्यातील बेस्ट बेकरीवर हल्ला झाला होता. १ मार्च २००२ रोजी सुमारे १ हजार लोकांच्या जमावाने केलेल्या या हल्ल्यात यात तब्बल १४ लोकांचा मृत्यू झाला होता. प्रथमदर्शनी आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे दिसत होते. मात्र तपासाअंती या १४ जणांची निघृण हत्या करुन आगीत टाकलं असल्याचं समोर आलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube