Gadchiroli 5 People Murder Case : अखेर एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा उलगडा; गडचिरोलीत नेमकं काय घडलं?
Gadchiroli 5 People Murder Case : गडचिरोली (Gadchiroli)जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचा Gadchiroli 5 People Murder Case उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याच कुटुंबातील महिलांना अटक केली आहे. संघमित्रा कुंभारे आणि रोजा रामटेके अशी त्या दोन महिला आरोपींची नावं आहेत. याच कुटुंबातील सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने आणि संपत्तीच्या वादामधून मामीने, असे दोघींनी मिळून हे हत्याकांड घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे.
…तर महाराष्ट्राचं भवितव्य काय? ड्रग्स रॅकेट प्रकारणावरुन रोहीत पवार यांचा उद्विग्न सवाल
संघमित्रा कुंभारे आणि रोजा रामटेके यांनी या पाचही जणांना धातूमिश्रीत विष देऊन त्यांचा जीव घेतल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. समोर आलेली माहिती अशी की, शंकर तिरुजी कुंभारे (वय 55) हे महागाव येथील रहिवासी होते. गावातच त्यांचे फर्निचरचे दुकान होते. त्यांना पत्नी विजया कुंभारे (वय 49) सागर कुंभारे (वय 29) ही दोन मुलं आणि कोमल विनोद दहागावकर (वय 31) ही विवाहीत मुलगी होती. सागर हा दिल्लीत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
गरबा खेळायला जाताय तर सावधान… पोलिसांनी केले महत्वाचे आवाहन
झालं असं की, 22 सप्टेंबरच्या रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरुजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर कुंभारे यांचीही तब्येत बिघडली. या दोघांचीही प्रकृती इतकी खालावली की, त्यांना उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असतानाच 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे यांचा तर 27 सप्टेंबरला विजया कुंभारे यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा लग्न झालेली त्यांची कन्या कोमल दहागावकर माहेरी होती. तब्येत बिघडल्यामुळे तीला चंद्रपूरला नेत असताना 8 ऑक्टोबरला सकाळीच उपचारादरम्यान तीचाही मृत्यू झाला.
दोघांच्या अंत्ययात्रेला मोठा मुलगा सागर आणि विजया कुंभारे यांची बहीण आनंदा उराडे आले. पुढे तिघांचीही तब्येत बिघडली. लहान मुलगा रोशन आणि वाहनचालक राकेश यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने सर्वजण रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर 14 ऑक्टोबरला आनंदा उराडे यांची प्राणज्योत मालवली, तर लहान मुलगा रोशन याचाही 15 ऑक्टोबरला मृत्यू झाला.
अशा पद्धतीनं वीस दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक अशा पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने घातपाताची शक्यता व्यक्त केली जात होती. पोलिसांच्या समोरही पाच जणांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान होते. अहेरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपास सुरु केला. हा घातपाताचा प्रकार असल्याच्या संशयावरुन तपास सुरु केला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, शंकर कुंभारे यांचा लहान मुलगा रोशन याचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्याशी डिसेंबर 2022 मध्ये प्रेमविवाह झाला. दोघेही पोस्टात नोकरीला आहेत. प्रेमविवाह मान्य न झाल्याने किंवा अन्य कारणाने काही महिन्यांपूर्वीच संघमित्राच्या वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यू झालेल्या पाच जणांचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. यातील पाचही जणांमध्ये जी लक्षणे दिसत होती; ती संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके(रोशन कुंभारेची मामी) यांना सत नव्हती. त्यामुळे त्या ठणठणीत दिसत होत्या. यावरुन पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सर्व गोष्टी समोर आल्या.