Download App

‘तर कायदेशीर उत्तर देऊ’; अजितदादांचा आमदार थेट शरद पवारांना भिडला

  • Written By: Last Updated:

Sangram Jagatap : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षासोबत बंड करून पक्षात उभी फूट पाडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आणि आज त्यांचे खाते वाटप देखील झालं. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केले. त्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांसोबत कारवाईचा धडाका सुरु केला आहे. (‘Then give a legal answer’; Ajitdad’s MLA Sangrama Jagpat On Sharad Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील 12 आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाकडून नोटीस बजावली आहे. अजित पवार गटातील नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा यात समावेश असल्याची चर्चा आहे. यावर आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, कोणतेही नोटीस अद्याप मला प्राप्त झाली नाही. नोटीस मिळालीच तर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असे म्हणत आमदार संग्राम जगताप थेट शरद पवारांना भिडले.

आगोदर त्या शपथ घेणाऱ्या 9 मंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आता शरद पवार गटाचे व्हिप जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या 12 आमदारांना नोटीस पाठवलेली आहे. 5 जुलै रोजीच्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या आमदारांना उत्तर देण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

शिवसेनेच्या तीन आमदारांचे शेवटचे अधिवेशन ठरणार? ठाकरे गटाने आखली आक्रमक व्यूहरचना

5 जुलै रोजी यशवंराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवार यांनी ते 9 मंत्री वगळता सर्व आमदारांना निमंत्रण पाठवले होते. परंतु या बैठकीला शरद पवार यांच्या गटातील फक्त 18 आमदार उपस्थित होते. तसेच याचं दिवशी अजित पवार यांनी देखील आपल्या गटाची बैठक बोलवली होती. शरद पवार गटाचे बाकीचे आमदार अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. पक्ष विरोधी कारवाई कारवाई केल्या प्रकरणी अजित पवार गटाच्या 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली तसेच या नोटिसीला उत्तर देण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

Tags

follow us