Download App

‘जरा संयम बाळगा… ओबीसींचे आंदोलन उभं करणं योग्य नाही’; विखेंनी भुजबळ-जरांगेंना फटकारले

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं, यासाठी लढा देत आहेत. मात्र ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यासाठी अंबडच्या एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) जोरदार टीका केली. त्यामुळं मराठा विरुध्द ओबीसी (obc) संघर्ष पेटला आहे. अशातच आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जरांगेसह भुजबळांना चांगलंच सुनावलं.

Nana Patole : ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची भूमिका काय? नाना पटोलेंनी सांगून टाकलं 

एकीकडे मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असतांना दुसरीकडे ओबीसींकडूनही आरक्षणाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता तीव्र होत आहेत. यासंदर्भात आज माध्यमांशी बोलतांना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे. त्यांच्या मागणीला सरकारची संमती आहेच, मात्र दोन जानेवारीपर्यंत जर सरकारने मुदत घेतली आहे तर जरांगे पाटलांनी देखील संयम ठेवायला हवा, असं वक्तव्य विखे यांनी केले.

Animal Trailer: अनिल कपूर अ‍ॅनिमलच्या ट्रेलर लाँचला का गेले नाही? अखेर समोर आलं सत्य… 

मंत्री विखे यांचे सुपुत्र तसेच खासदार सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मंत्री विखे नगर शहरातील विळद येथे आले होते. या कार्यक्रमानंतर विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

जरांगेंनी एल्गार पुकारल्यानंतर त्याला प्रतिकार म्हणून मंत्री छगन भुजभळांनी मराठा आरक्षणाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला. ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरात सभा घेण्यात येत आहेत. यावरही विखेंनी भाष्य केलं. ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती, असं ते म्हणाले.

विखे म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी भुजबळ यांना चांगलचं सुनावले आहे. विखे म्हणाले, भुजबळ यांनी जो ओबीसीचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती तर हा उठाव ठीक होता. पण कुणीतरी आरक्षण मागत आहे म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभा करायचं हे योग्य नाही, असं राधाकृष्ण विखेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, आता ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती असं वक्तव्य करणाऱ्या विखेंना आता भुजबळांकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us