Download App

धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…

MLA Hiraman Khosakar : नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार (Nashik Bajar Samiti) समिती निवडणुकीवरून हा वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान यावर बोलताना काँग्रेसचे आमदार खोसकर यांना थेट रडू कोसळले. रडत रडत आमदार म्हणाले मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. यांच्या हातून मारण्यापेक्षा मी आत्महत्या करील असे धक्कादायक विधान आमदार हिरामण खोसकर यांनी केले आहे.

नेमकं प्रकरण काय?
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत पिंगळे आणि चुंभळे गट आमने सामने आहे. पिंगळे गटाचे समर्थक आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khosakar) यांना चुंभळे गटाकडून धमकीचा फोन आला. शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी थेट आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी चुंभळे गटाचे शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे यांच्यावर नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार रडले अन् आत्महत्येची दिली धमकी
या प्रकरणावर बोलताना आमदार खोसकर म्हणाले, बाजार समित्यांच्या निवडणुक अनुषंगाने पक्षांच्या आदेशानुसार या निवडणुकीचे काम करण्यास आम्हाला सांगितले आहे. यावर मला चुंभळे गटाचे शिवाजी चुंभळे यांनी फोन करत मला जवे मारण्याची धमकी दिली. हे काही योग्य नाही असे मी त्यांना समजावले मात्र त्यांनी अरेरोवीची भाषा केली. सातत्याने शिवाजी चुंभळे आणि अजिंक्य चुंभळे या बापलेकांचे मला फोन येऊ लागले होते.

मी फोन उचलला नाही, मात्र काही काळानंतर मी अजिंक्य चुंभळे यांचा फोन रिसिव्ह केल्यानंतर त्यांनी मला धमकी दिली. माझ्या बापाच्या नादी लागला तर बघ मी काय करतो. पिंगळेचा प्रचार करायचा नाही. असे केले व आमच्या नादी लागला तर बघ तुझं काय करतो अशी धमकी मला फोनवर दिली.

साईभक्तांसाठी महत्वाची बातमी… संस्थानाने भाविकांसाठी घेतला मोठा निर्णय

आमदार खोसकर म्हणाले, मला निवडणूक लढवायची नाही. मी शेती करेल. मला अशी जीवे मारण्याची धमकी देत असतील तर त्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या करून घेईल असे म्हणत आमदारांना रडू कोसळले. अशा पद्धतीने दादागिरी करणार असतील तर आम्ही काय घरात बसायचं का? यांची हुकूमशाही आमची मुस्कटदाबी करू लागली असल्याची खंत यावेळी आमदार खोसकर यांनी व्यक्त केली.

अक्षय्य तृतीयेला जुळून येतायत 7 विशेष महायोग… जाणून घ्या

आमदार म्हणून मी काम करू नको का?
मी निवडणुकीचे काम करतो आहे मात्र मला अशा पद्धतीने जीवे मारण्याची धमकी देत आहे. मी याबाबत पोलीस प्रश्नाला भेटून तातडीने कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. तसेच याबाबत पक्षातील वरिष्ठांशी देखील चर्चा करणार आहे. यांच्यावर प्रशासन अंकुश लावला नाही तर हे कधीही मला मारून टाकतील असे खोसकर म्हणाले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज