अक्षय्य तृतीयेला जुळून येतायत 7 विशेष महायोग… जाणून घ्या

अक्षय्य तृतीयेला जुळून येतायत 7 विशेष महायोग… जाणून घ्या

Akshay tritiya 2023 : हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवसापासून अनेक युगे सुरू झाली असून भगवान विष्णूचे अनेक अवतारही झाले आहेत. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामांनीही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अवतार घेतला होता. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. यंदा अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिलला म्हणजेच आज साजरा होत आहे. यावेळी अक्षय्य तृतीया खूप खास मानली जाते. वास्तविक, यंदा अक्षय्य तृतीयेला सात शुभ योग तयार होत आहेत.

शुभ योग आणि मुहूर्त
आजच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत असेल. यासोबतच आयुष्मान योग, शुभ कृतिका नक्षत्र राहील (नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे), सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, अमृत सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योग राहील. अक्षय्य तृतीया तिथी 22 एप्रिल रोजी सकाळी 7.50 पासून सुरू होईल आणि 23 रोजी सकाळी 7.48 पर्यंत चालेल.

अयोध्येत बस – ट्रकचा भीषण अपघात; 7 ठार तर अनेकजण जखमी

जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व
अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासूनच चार धामची यात्रा सुरू होते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या दिवशी केलेल्या कार्याचे फळ अक्षय्य असते. म्हणजेच त्याचा कधीही नाश होत नाही. धार्मिक दृष्टिकोनातून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करावे. तसेच या दिवशी सोने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. यासोबतच केदार, पर्वत, शंख, महादान, सुमुख, आयुष्मान आणि ध्वज असे सात शुभ योगही तयार होतील. त्यामुळे या दिवशी केलेल्या कामामुळे सुख-समृद्धी वाढते.

साईभक्तांसाठी महत्वाची बातमी… संस्थानाने भाविकांसाठी घेतला मोठा निर्णय

अक्षय्य तृतीया पूजा पद्धत
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा आणि हवन केल्याने विशेष लाभ होतो. यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. या दिवशी पवित्र स्नान करून विशेष दान अर्पण केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube