त्र्यंबकेश्वर मंदिरात 100 वर्षांची धूप दाखवण्याची कोणती परंपरा आहे, हे संजय राऊतांनी दाखवावं असं खुल चॅलेंज भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिलं आहे. तुषार भोसले यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर समितीची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना खुलं चॅलेंजच दिलं आहे.
RBI : काय आहे Clean Note Policy? याच धोरणामुळे RBI ने 2000 रुपयांच्या नोटा घेतल्या परत
तुषार भोसले म्हणाले, त्र्यंबकेश्वर मंदिरात संदलची धूप दाखवण्याची शंभर वर्षांची परंपरा आहे. मग महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी तिच रीघ पुढे रेटली. याचा पुरावा देताना अनेक माध्यमातून स्थानिक शांतता समितीची एक पत्रकार परिषद दाखवली गेली. यामध्ये त्यांनी म्हटलंय की ही परंपरा जुनी आहे, अशी संजय राऊतांची भूमिका आहे.
संजय राऊतांची पत्रकार परिषद नीट ऐकली तर त्यात म्हटलं की, ही परंपरा जुनी आहे, चौकात धुप दाखवण्याची परंपरा आहे. पण यावेळी ते मंदिराच्या प्रवेशद्वारावर का गेले हे आम्हाला कळलं नाही. त्यामुळं संजय राऊतांचे दात घशात घालण्याचं काम केलं आहे. म्हणून राऊतांना माझं चॅलेंज आहे की, त्यांनी धूप मंदिरात दाखवण्याची कोणती परंपरा आहे हे दाखवून द्यावं, असं तुषार भोसले म्हणाले आहेत.
Jui Gadkari: जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “माझी अनेक लग्न झालीत…”
मंदिरात धूप दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर पॉक्सोसह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची बाजू संजय राऊत घेत आहेत. संजय राऊतांचं कृत्य पाहता ते आयएसआयच्या एजंटला लाजवेल असं त्यांच कृत्य आहे. त्यांनी धर्माविरोधातल्या शक्तींना बळ देण्याचं काम केलं आहे. संजय राऊत हे जिहाद्यांचे एजंट आहेत की काय? असा सवालही तुषार भोसले यांनी केला आहे.
तसेच तुम्ही पॉक्सोवाल्यांशी सलोखा करतात काय? पण आम्ही नाही करु शकत. एकीकडे मंदिर समिती अशी कोणतीही परंपरा नसल्याचं सांगत आहेत. आता संजय राऊतांनी त्यांच्या धर्मात कोणती परंपरा आहे हे दाखवावं, असं खुलं चॅलेंजच त्यांनी दिलं आहे.
परमवीर सिंह यांच्याकडून अदृश्य शक्तीचा वापर, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप…
याआधी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं म्हणूनच ते लोकं मंदिराच्या दोन पायऱ्या उतरुन मंदिरात पोहचले होते. पण आता राज्यात हिंदुत्ववाद्यांचं सरकार असल्यानेच धूप दाखवण्याचा प्रयत्न करताच दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घालून एसआयटी नेमली आहे. पण विरोधकांकडून राज्य सरकारला बदनाम करण्याच काम सुरु असल्याच आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, काही लोकं या प्रकरणात पुरोगामीपणाचा आव आणत आहेत. पण नको तिथं पुरोगामीपणा करु नका, धार्मिक परंपरेचे अधिकार मंदिर आणि जाणकार सांगत असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना एक इशाराच दिला आहे.