Download App

नगरकरांनो काळजी घ्या! कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटचा जिल्ह्यात शिरकाव, ‘एवढे’ रुग्ण आढळले

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : दोन-अडीच वर्षीपूर्वी कोरोना व्हायरसने (Corona virus) जगाची चिंता वाढवली होती. कोरोनामुळं अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने नागरिकांची चिंता वाढवली आहे. JN.1 या नवीन व्हेरियंटमुळं गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केरळमध्ये देशातील पहिला रुग्ण आढळल्यानंतर, JN.1 व्हेरियटनं (JN.1 Variant) राज्यातही शिरकाव केला. चिंताजनक बाब म्हणजे नगर जिल्ह्यात देखील या व्हेरियंटचा शिरकाव झाला असून  जिल्ह्यात दोन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर आहे.

उमेदवारीसाठी दबाव आणू नका, अन्यथा धक्कातंत्र पाहिलेच आहे! फडणवीसांची इच्छुकांना तंबी

जगभरात नव्या वर्षाचे स्वागत सुरु असताना सेलिब्रेशनच्या रंगात असताना राज्यासह नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरात अनेक ठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एकीकडे जिल्ह्यात 31 डिसेंबरची धूम सुरू असतांना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे दोन रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीला रुग्ण मिळून आल्याने मनपा आरोग्य विभाग सतर्क झाले असून नागरिकांनी विशेष खबदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Box Office: रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने रचला नवा विक्रम, शाहरुख खानच्या ‘पठाण’ला टाकले मागे 

कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या जेएन 1 या व्हायरसचा राज्यात प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. यातच नवं वर्षाचे स्वागत करण्यात आल्याने मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी जमाव जमू लागला होता. यामुळे पुन्हा एकदा मोठ्या संख्येने याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णंसंख्येमुळे आरोग्य विभाग देखील चिंतेत आहे.

ख्रिसमसच्या आधी जेएन 1 कोरोना प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली जात नव्हती. मात्र, आता कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशभरात चिंता वाढली आहे.

काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असला तरी कोरोनाचा JN.1 व्हेरियंट खूप असा घातक नसल्याचे तज्ञ सांगत आहेत. मात्र असं असलं तरी तरी नागरिकांनी आपल्यासह इतरांची देखील घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यापासून बचाव करण्यासाठी सर्वप्रथम लोकांनी मास्कचा वापर करावा, असा सल्लाच आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. नव्या वर्षानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जनतेने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

follow us

वेब स्टोरीज