‘ताबेयुक्त, दहशतयुक्त, खड्डेयुक्त वाढदिवसाच्या…’, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून विखेंना खोचक शुभेच्छा

अहमदनगर : आगामी वर्षात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहे. आता याच निमिताने राजकीय नेते मंडळी देखील एकमेकांवर टीका टिपण्णी करू लागली. दरम्यान नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंचा (Sujay Vikhe) आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अशातच शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी विखेंना शुभेच्छा देत शाब्दिक टोला लगावला. खासदाराने कमीत […]

आपला अभिनय पडद्यावर दाखवा, पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर नाही; सुजय विखेंचा कोल्हेंना खोचक टोला

Sujay Vikhe

अहमदनगर : आगामी वर्षात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहे. आता याच निमिताने राजकीय नेते मंडळी देखील एकमेकांवर टीका टिपण्णी करू लागली. दरम्यान नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंचा (Sujay Vikhe) आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अशातच शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी विखेंना शुभेच्छा देत शाब्दिक टोला लगावला. खासदाराने कमीत कमी वाढदिवस तरी नगर शहरात करावे. खासदारांना दहशतयुक्त, ताबेयुक्त, नगर शहरातील खड्डेयुक्त वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात त्यांनी खासदार विखेंना शाब्दिक टोला लगावला.

मध्य प्रदेशात भाजपकडून शिवराज सिंह चौहान यांच्यासह ‘हे’ नेते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये

गेल्या काही दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्त खासदार सुजय विखे यांनी उत्तरेत जनतेला मोफत साखर वाटप केली होती. यावरून विक्रम राठोड यांनी विखेंवर निशाणा साधला होता. दक्षिणेतून निवडून यायचं आणि उत्तरेतील जनतेची दिवाळी गोड करायची. दक्षिणेतील जनतेची मत चालतात, मात्र त्यांची दिवाळी अंधारात, अशी टीका राठोड यांनी केली होती. तसेच अनेक राजकीय विषयांवरून विक्रम राठोड यांच्याकडून विखे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला जात आहे.

Supriya Sule : पुणे शहरातील बांधकामं तात्काळ थांबवा; ‘या’ कारणामुळे सुळेंची मागणी 

दरम्यान साखर वाटपावरून विखे यांनी देखील आपल्या एका सभेदरम्यान विक्रम राठोड यांच्यासह त्यांच्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मी साखर वाटप माझ्यावर टीका व्हावी यासाठी केली. मला माहित आहे कि, बोलणारा एक आहे व स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा आहे. नगरमध्ये हे चालत आलं. लिहिणारा वेगळा आणि वाचक वेगळा आहे. मात्र, कोणाच्या नाड्या कशा आवळायच्या हे मला चांगलं माहीत आहे.

तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, मी उत्तरेत साखर वाटली तर काहींनी माझ्यावर टीका केली. दिवाळी गोड करण्याची जबाबदारी हि काय खासदारांची आहे का? गेल्या तीस वर्ष दिवाळी कुठं होती? काहींनी आमदारकी उपभोगली मात्र त्यांनी काही केलं का ? तुम्ही ज्या चार वर्षाच्या खासदारांकडून हिशोब मागता, तर तुम्ही देखील तुमच्या तीस वर्षांच्या कार्यकाळातला हिशोब देणं लागतं, अशा शब्दात विखे यांनी विक्रम राठोड यांचा नामोल्लेख टाळत जोरदार प्रत्युत्तर दिलं.

वाढदिवसांच्या खोचक शुभेच्छा…
आगामी काळात राज्यात निवडणुका असल्याने राजकीय नेतेमंडळींकडून सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. यातच यंदाचे दिवाळी फराळाला राजकीय निवडणुकीचा वास येऊ लागल्याने आता नेतेमंडळी देखील सरसावली आहे. यातच नगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना राजकीय विश्वातून शुभेच्छा येत आहे. सातत्याने विखेंवर टीका करणाऱ्या विक्रम राठोड यांनी विखेंवर खोचक टीका केली. खासदाराने कमीत कमी वाढदिवस तरी नगर शहरात करावे. खासदारांना दहशतयुक्त, ताबेयुक्त, नगर शहरातील खड्डेयुक्त वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात राठोड यांनी विखेंना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, यावर आता सुजय विखेंकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version