Maratha Reservation : आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी काय करावं? सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : आरक्षणासाठी राजकीय पक्षांनी काय करावं? सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने होत आहेत. नगर जिल्ह्यातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणी काही बोलले तरी त्याचा विपर्यास होतो हे अत्यंत दुर्दैवी असून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे खासदार विखे पाटील म्हणाले.

खा.सुजय विखे पाटील यांनी राहाता शिर्डी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास भेट देत उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे नमूद करून खा.विखे पाटील म्हणाले,आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता नेत्यांची घर जाळण्यापर्यत येवून ठेपणे हे योग्य नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनीधीने व्यक्त केलेल्या प्रतिक्रयेचा विपर्यास केला जाणेही योग्य नाही.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत…’

सर्वच लोकप्रतिनिधीनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या बाबतीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा पक्षीय जोडे बाजूला ठेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्रितपणे काय करता येईल याचा विचार करण्याची गरज असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

पाण्याला हात लावणार नाही – जरांगे पाटील 

गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी सांगितले की, राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

सरकारला आरक्षण द्यावेच लागणार 

मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही. मला माझ्या जातीवर अन्याय मला सहन होणार नाही. जाणून बुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोटे गुन्हे दाखल केल्या आहेत. जाणूनबुजून प्रशासन सरकारच ऐकून आंदोलकांचा छळ करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी यावेळी केला. आता मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. असे आंदोलनाचे 6-7 टप्पे होणार आहेत. या एखाद्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज