उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे राहुल गांधींना सुनावले…. सावरकरांचा अपमान करू नका

नाशिक : राहुल गांधींना (Rahul Gandhi) मला एक सांगायचे आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. आमचे संजय राऊत (Sanjay Raut) त्या यात्रेत सहभागी झाले होते. पण आज जाहीरपणे सांगतो की ही लढाई लोकशाहीची लढाई आहे. सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel

नाशिक : राहुल गांधींना (Rahul Gandhi) मला एक सांगायचे आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. आमचे संजय राऊत (Sanjay Raut) त्या यात्रेत सहभागी झाले होते. पण आज जाहीरपणे सांगतो की ही लढाई लोकशाहीची लढाई आहे. सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला आहे.

संसदेत विदेशातील भाषणावरुन राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून केली जात होती. यावर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की ‘मी सावरकर नाही, माफी मागणार नाही.’ भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली होती त्यावेळी ते देखील राहुल गांधींनी सावरकारांबद्दल असेच विधान केले होते. यावरुन देशभरात गदारोळ उडाला होता. यावरुन भाजपने शिवसेनेला लक्ष केले होते. परंतु त्यावेळी शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आज मालेगावच्या जाहीर सभेत राहुल गांधींना सुनावले आहे.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काहीतरी शिजतयं….

उद्धव ठाकरे म्हणाले, सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो पण सावरकरांनी काय केलं हे समजण्यासाठी तेव्हाचा काळ आपल्या डोळ्यासमोर आणला पाहिजे. चाफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर पंधरा वर्षांचं पोर घरातल्या अष्टभुजा देवीसमोर जाऊन शपथ घेतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या शत्रुला चाफेकरांसारखे मारत मारत मरेन किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करीन. ही पंधराव्या वर्षी शपथ घेणारे सावरकर होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray यांचा शिंदे गटावर हल्लाबोल : गेल्या वर्षी एक ‘कांदा’ ५० खोक्याला विकला गेला!

ते पुढं म्हणाले, सावरकरांच्या वाड्यात लहान असताना शिवसेना प्रमुखांबरोबर गेलो होतो. त्या काळातील त्यांचे शस्त्र, सावरकरांचे वडील टिळक भक्त होते. सावरकरांनी जे काही केलं आहे ते येड्यागबाळ्याचे काम नाही. चौदा वर्षे रोज मरण यातना, चाबकाचे फटके खायचे, घाण्याला जुंपायचे, टांगून ठेवायचे, वाटेल तसा छळ केला, चौदा वर्षे छळ सहन केला. ते देखील एकप्रकारे बलिदानच आहे.

जसे आपले क्रांतीकारक फाशी गेले, गोळ्या खाऊन बलिदान दिले तसंच चौदा वर्षे मरनयातना सहन करणं हे येड्यागबाळ्याचे काम नाही. म्हणून मी राहुल गांधींना सांगतो की आपण एकत्र आलो आहेत जरुर पण ती देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी. त्यामध्ये कोठे फाटे फुटू देऊ नका. मुद्दाम तुम्हाला डिवचले जात आहे. आता जर वेळ चुकली तर आपला देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, असा राहुल गांधींना सल्ला देत भाजपवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.

Exit mobile version