राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काहीतरी शिजतयं….

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काहीतरी शिजतयं….

Eknath Shinde Meets Raj Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती याचा तपशील अजून मिळालेला नाही. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन नेत्यांच्या या भेटीमुळे अनेक राजकीय तर्क लावले जात आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काहीतरी शिजतयं का, अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Ajit Pawar : ‘जिल्हा बॅंकेत शेण खाणाऱ्याला असा झटका देणार की…’ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत माहिममध्ये समुद्रात तयार झालेल्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता. हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. या मुदतीत जर बांधकाम हटवले गेले नाही तर या बाजूलाच मोठे गणपती मंदिर बांधण्याचाही इशारा दिला होता.

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर सरकारने अवघ्या 24 तासांच्या आत सरकारने मुंबई महानगरपालिकेला तसे निर्देश देऊन हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. यावर बरीच राजकीय टीकाटिप्पणी झाली. सत्ताधारी आणि विरोधकांत तर अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

K Chandrashekhar Rao यांचे फडणवीसांना चॅलेंज…तर मी महाराष्ट्रात येणार नाही!

इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी काल विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या कारवाईचे समर्थन केले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी लगेचच शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=yasw0u4EJwM

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube