अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये खलबंत सुरू आहेत. पारनेर-नगर विधानसभा (Parner-Nagar Assembly) मतदारसंघातही राजकीय घडामोडींना वेग आला. दोन दिवसांपूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे (Dr. Shrikant Pathare) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पठारेंनी मतदारसंघातील बूथ, गण, गटनिहाय आढावा बैठका सुरु केल्या. त्यांनी बैठकांचा धडाकाच लावला.
Beed Politics : भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंची पक्षाला सोडचिठ्ठी, अपक्ष निवडणुक लढवणार?
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार मातोश्री गाठत ठाकरेंच्या भेठीगाठी घेतल्या आहेत. त्यांनी विधानसभेचे जोरदार तयारी केली. नुकतीच त्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. त्या भेटीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून चर्चा झाली. या भेटीनंतर शिवसेना (उबाठा) निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार असून कोणत्याही परिस्थितीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवणार असं डॉ.श्रीकांत पठारेंनी सांगितलं.
मुंबईतील 14 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर; आशिष शेलारांसह त्यांचे मोठे बंधू विधानसभेच्या रिंगणात
आदित्य ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीनंतर पठारे यांनी मतदारसंघातील बूथ, गण, गटनिहाय आढावा बैठका सुरु केल्या. त्यांनी बैठकांचा धडाकाच लावला आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात ३६६ बूथ, १४ गण, ७ गट असून पारनेर शहरातील नगरपंचायतचाही यात समावेश आहे. त्यादृष्टीने पठारे हे मातोश्रीवरील बैठकीवरुन आल्यापासून सातत्याने मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.
मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना…
आता गण, गटनिहाय बैठकांचे सत्रच डॉ. श्रीकांत पठारे यांनी सुरु केले आहे. मतदान घडवून आणण्यासाठी लागणारी शिवसैनिकांची फौज उभी करण्याचे काम यात सुरु असून महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना डॉ. श्रीकांत पठारे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आहेत.
दरम्यान, पारनेर – नगर मतदारसंघ खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके या इच्छुक आहेत. तर ठाकरे गटाकडून डॉ. श्रीकांत पठारे इच्छुक आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत पारनेर-नगर विधानसभेची जागा कुणाला सुटणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.