Download App

शेवगावकरांना महिन्यातून फक्त दोनदाच पाणी पुरवठा, लोकप्रतिनिधी मौन बाळगून

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी मात्र धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यामुळे अद्याप तरी दुष्काळाची झळ बसली नाही. मात्र जिल्ह्यातील एक तालुका असाही आहे कि जिथे महिन्याभरात केवळ दोनदा पाणीपुरवठा हा होतो. नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात 15 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा (water supply) केला जातो. विशेष म्हणजे जायकवाडी धरण उशाशी असलेल्या शेवगाव शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे नगर परिषदेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी देखील याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत वेळ काढून घेत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला लोकप्रतिनिधी असताना महिलांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरत संघर्ष करावा लागतो आहे. किंबहुना लोकप्रतिनिधीच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील नागरिक करू लागले आहे.

होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा PM मोदींविरोधात शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ 

शेवगाव शहरात दहा ते पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कित्येक सर्वसामान्य कुटूंबाकडे इतके दिवस पाणीसाठा करण्याकरिता व्यवस्था नसल्याने नागरिक घरात टाक्‍या, बकेट, भांड्यांमध्ये पंधरा दिवस पाणी साठवून ठेवतात. साठलेल्या उघड्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास, अळूया होत असून नागरिकांना डेंग्यूची बाधा होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्‍न निर्माण होत आहे.

खासदार दानिश अलींची बसपामधून हकालपट्टी; राहुल गांधींना साथ दिल्याने मायावतींची कारवाई? 

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण व्यवस्थेत आपण तातडीने लक्ष घालावे जेणेकरुन शहराला किमान चार दिवसाला तरी पाणी पुरवठा होईल, याबाबत तातडीने पावले उचलली जावीत. धरणातून मुबलक पाणी मिळत असून ही परिस्थिती का निर्माण होत आहे याचाही सखोल अभ्यास नगरपरिषदेच्या प्रशासनाने करणे आवश्यक आहे. मात्र सर्व सामान्य शेवगावकरांना वेठिस धरण्याचे काम किमान नगरपरिषदेच्या प्रशासनाने तरी करू नये, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.

प्रशासन गप्प तर लोकप्रतिनिधी….
शेवगाव पाथर्डी मतदार संघामध्ये आमदार मोनिका राजळे या महिला लोकप्रतिनिधी आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. महिला लोकप्रतिनिधी असून महिलांच्या समस्यां सोडवण्यासाठी कोणताही पुढाकार त्या घेत नसल्याने नागरिकांमधून संतोषची लाट निर्माण झाली आहे. तसेच नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून देखील केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. एकीकडं लोकप्रतिनिधी केवळ विकासकामांच्या गप्पा मारत असताना त्यांच्याच मतदार संघात महिला आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरू लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

Tags

follow us