खासदार दानिश अलींची बसपामधून हकालपट्टी; राहुल गांधींना साथ दिल्याने मायावतींची कारवाई?
बहुजन समाजवादी पक्षाच्या (Bahujan Samajwadi Party) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी खासदार दानिश अली (Danish Ali) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. एक निवेदन जारी करत बसपने या कारवाईची माहिती दिली. यात म्हटले की, पक्षाची धोरणे, विचारधारा आणि शिस्तीच्या विरोधात कोणतेही कृत्य करू नका, असे अनेकवेळा तोंडी सांगितले होते, परंतु त्यानंतरही त्यांनी सातत्याने पक्षाविरोधी गोष्टी केल्या आहेत. (Bahujan Samajwadi Party chief Mayawati has expelled MP Danish Ali from the party.)
या निवेदनात पुढे म्हटले की, “2018 मध्ये दानिश अली कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा यांच्या जनता पक्षाचे (धर्मनिरपेक्ष) सदस्य होते. 2018 मध्ये कर्नाटकच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) यांनी युतीत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दानिश अली खूप सक्रिय होते. कर्नाटक निवडणूक निकालानंतर एचडी देवेगौडा यांच्या विनंतीवरून दानिश अली यांना अमरोहामधून बसपाच्या तिकीटावर रिंगणात उतरविण्यात आले होते.
“जिवंत असेपर्यंत ओवेसीसमोर शपथ घेणार नाही” : भाजप आमदाराचा निर्धार, तेलंगणात हायव्होल्टेज ड्रामा
दानिश अली यांना तिकीट देण्यापूर्वी एचडी देवेगौडा यांनी बहुजन समाज पक्षाच्या सर्व धोरणांचे पालन करतील आणि पक्षाच्या हितासाठी काम करतील असे आश्वासन दिले होते. दानिश यांनीही या आश्वासनाची पुनरावृत्ती केली होती. त्यानंतर त्यांना बसपचे सदस्यत्व देण्यात आले होते. अमरोहातून निवडणूक जिंकत ते लोकसभेवर निवडून गेले, मात्र त्यांनतर ते पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतले. त्यामुळे आता पक्षाच्या हितासाठी त्यांना तातडीने निलंबित करण्यात येत आहे.
Rajasthan CM : बाबा बालकनाथ यांची माघार; स्वतःच दिली माहिती! वसुंधराराजे पुन्हा ‘बॉस’?
दानिश अली यांनी काय केले होते?
सप्टेंबर 2023 मध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर अनेक प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अली यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन अली यांची भेट घेतली. दानिश अली यांनीही विरोधकांच्या एकजूटीत सहभाग नोंदविला होता. शुक्रवारी (8 डिसेंबर) संसदेबाहेर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली होती.